World record : नगरच्या कथक नृत्यांगना करणार विश्वविक्रम

World record : नगरच्या कथक नृत्यांगना करणार विश्वविक्रम

0
World record

World record : नगर : नगर जिल्हा हा सांस्कृतिक वैविध्य जपणारा जिल्हा आहे. नगरचे कलावंत विविध क्षेत्रांत अग्रेसर आहेत. नगरच्या कथक नृत्य (Kathak dance) कलाकार पुणे येथे होणाऱ्या ‘नृत्यचक्र’ कार्यक्रमात झळकणार आहे. या कार्यक्रमातून विश्वविक्रम (World record) करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये (Limca Book of Records) होणार आहे.

हे देखील वाचा: आजपासून निवडणूक आयोगाचं नाव धोंड्या; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

बाराशे नृत्यांगना एकत्रितरित्या नृत्य संरचना सादर करणार (World record)


‘नृत्यचक्र’ हा कथक नृत्यावर आधारित एक भव्य दिव्य असा आगळावेगळा कार्यक्रम येत्या रविवारी (ता. २५) पुणे येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील तब्बल २० शहरांमधील सुमारे बाराशे कथक नृत्यांगना यामध्ये एकत्रितरित्या नृत्य संरचना सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी नगर शहरातील कथक नृत्यालय या संस्थेच्या संचालिका कल्याणी कामतकर (निसळ) यांच्या नेतृत्वासह एकूण ३२ विद्यार्थिनी आपली कला सादर करणार आहेत.

नक्की वाचा: नटसम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

सर्व दिग्गज गुरू या कार्यक्रमाला उपस्थित राहणार (World record)

 
यात मीरा भजनावर आधारित नृत्य सादर होणार आहे. नृत्यचक्र या कार्यक्रमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये कथक नृत्याचे नाव नोंदविले जावे यासाठी हा एक प्रयत्न आहे. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना ज्योती मन्सुखानी यांची असून अस्मिता ठाकूर यांच्या साथीने ती प्रत्यक्षात उतरत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजस्विनी साठे, डॉ. माधुरी आपटे, रसिका गुमास्ते यांचाही सक्रिय सहभाग तसेच मोलाचे सहकार्य लाभले. अमोद कुलकर्णी यांनी नृत्यचक्र या कार्यक्रमासाठी संगीत संयोजन केले आहे. पुण्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गुरू या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सोशल मीडियावर थेट पाहता येणार आहे, अशी माहिती कल्याणी कामतकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here