World Record : नगरच्या कलावंतांचे तीन विश्वविक्रम

World Record : नगरच्या कलावंतांचे तीन विश्वविक्रम

0
World Record
World Record : नगरच्या कलावंतांचे तीन विश्वविक्रम

World Record : नगर : नाशिक येथे आर्ट असोसिएट्सच्या पुढाकारातून शास्त्रीय नृत्यांचा (Classical Dance) कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात नगरच्या कल्याणी कामतकर संचलित कथक नृत्यालय यांनी तसेच आर्मी पब्लिक स्कूल (Army Public School), अहमदनगर यांच्या एकूण ५० शिष्यवृंदांनी सहभाग नोंदवला. सलग ४८ मिनिटे विविध देव देवतांच्या कथा या सर्व कलाकारांनी नृत्यातून सादर केल्या. तेथे या कलावंतांनी तीन विश्वविक्रम (World Record) केले.

हे देखील वाचा: नगर लोकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत; नाटयमय घडामाेडीनंतर भल्याभल्यांची सपशेल माघार

तब्बल १३ तास ३७ मिनिटे चालला सोहळा (World Record)

 सलग ४८ मिनिटे विविध देव देवतांच्या कथा या सर्व कलाकारांनी नृत्यातून सादर केल्या.  या कार्यक्रमाद्वारे आपल्या प्रगल्भ पौराणिक कथांच्या साठ्यातील काही मनमोहक कथा २८ वेगवेगळ्या समूहांकडून अप्रतिमपणे सादर झाल्या. तब्बल १३ तास ३७ मिनिट चालणारा हात दैदीप्यमान सोहळा, जवळपास सात हजार पेक्षा अधिक लोकांनी वेगवेगळ्या माध्यमांतून आणि ५०० लोकांनी प्रत्यक्ष अनुभवला.

नक्की वाचा: ‘देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात तो सत्तेचा गैरवापर’-रोहित पवार

तीन जागतिक विश्वविक्रमांची नोंद (World Record)

नाशिक कुठल्याही एका शास्त्रीय नृत्यापुरते सीमित न राहता भारतातील सर्व शास्त्रीय नृत्यांचा विचार करून, त्यांचा आवाका आणि त्यांची विविधता लक्षात घेऊन, त्यांना कथेच्या माध्यमातून प्रस्तुत करण्याचा सुंदर नृत्याविष्कार हा कलावंतानी सादर केला. या कार्यक्रमांद्वारे तीन जागतिक विश्वविक्रमांची नोंद झाली आहे. १३ तासांहून अधिक काळ चाललेल्या या कार्यक्रमाद्वारे नाशिककरांना संगीतमय नृत्यकथांची एक अनोखी,अविस्मरणीय सफर घडली.


काल (ता.२७) सकाळी शिववंदनेने सुरू झालेला हा नृत्यप्रवास कथक, भरतनाट्यम, ओडिसी, कुचिपुडी, मोहिनिहट्टम् आणि हत्रिय अश्या ६ प्रकारातील शास्त्रीय नृत्यांना कलावंतांनी एका पाठोपाठ सादर करत एका वेगळ्याच उंचीवर नेले. नृत्य आविष्काराची सांगता तांडव नृत्याने झाली. या नृत्यपर्वणीत सहभाग नोंदवायला महाराष्ट्रभरातून विविध गुरुकुलांमधील ४०४ कलाकार उपस्थित राहिले होते. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी २७ तारखेला विश्वविक्रम जाहीर केला. त्यासोबतच आज (ता.२८) वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनकडून देखील या विक्रमाला मान्यता देण्यात आली. अजून चौथ्या पुष्टीची आर्ट असोसिएट्स वाट बघत आहे. आर्ट असोसिएट्सच्या अमी छेडा, राधिका चावरे आणि तोरल टकले या तिघींनी त्यांच्या पाहिल्याच कार्यक्रमात यशाचे उंच शिखर गाठले. आर्ट असोसिएट्सची टीम आणि कलाकारांनी नाशिक नगरीत हा इतिहास घडताना पाहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here