Aman Sehrawat: कुस्तीपटू अमन सेहरावतची ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये एन्ट्री 

भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याने ५७ किलो वजनी गटात झालेल्या लढतीत अल्बेनियाच्या जेलिमखान एबकारोवला पराभूत केले.

0
Aman Sehrawat
Aman Sehrawat

Paris Olympic wrestling : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत (Paris Olympic) भारताला आतापर्यंत चांगल्या पदकांची कामगिरी करता आलेली नाही. आता स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात आखाड्यातून पदकाची आस वाढली आहे. त्यातच भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत(Aman Sehrawat) सेमीफायनलमध्ये प्रवेश (Semifinal Entry) केला आहे. त्याने ५७ किलो वजनी गटात झालेल्या लढतीत अल्बेनियाच्या जेलिमखान एबकारोवला पराभूत केले. एका बाजूला महिला गटात अंशु मलिकला पराभवाचा सामना करावा लागला असताना अमन सेहरावत याने पदकाच्या दिशेनं झेप घेतली आहे.

नक्की वाचा : पुण्यात पावसाची रिमझीम;या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

अमनने अल्बेनियाच्या पैलवानाला बॅकफूटवर पाडले (Aman Sehrawat)

अमन सेहरावत याने क्वार्टर फायनल लढतीत सुरुवातीच्या फेरीपासूनच आपली पकड मजबूत करण्यावर भर दिला. आक्रमक खेळ दाखवत त्याने अल्बेनियाच्या पैलवानाला बॅकफूटवर पाडले.  त्याचा आक्रमक तोरा पाहून जेलिमखान एबकारोव हा बचावात्मक खेळताना दिसला. याचा फायदा उठवत अमन सेहरावत याने संधीच सोनं करत परफेक्ट डाव टाकून ३- १ अशी आघाडी घेत  फायनलचे तिकीट पक्कं  केले आहे.

अवश्य वाचा : अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न बनला गंभीर; जनतेच्या सुरक्षिततेसाठी लंके मैदानात

कुस्तीपटू अमन सेहरावत सेमीफायनलमध्ये (Aman Sehrawat)

कुस्तीपटू अमन सेहरावत याने दुसऱ्या फेरीत आक्रमकता आणखी वाढवली. दुसऱ्या मिनिटात त्याने ८ अंक मिळवून देणारा डाव खेळला. ज्यात त्याने प्रतिस्पर्धी एबकारोव याला तीन वेळा फिरवले. पहिल्या फेरीतील ३ गुण आणि त्यानंतर ८ अंक मिळवून देणारा डाव खेळत अमन सेहरावतने ११-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर टेक्निकल सुपीरियॉरिटीनुसार, त्याला विजयी घोषित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here