Vinesh Phogat:भारताला मोठा धक्का!विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र

भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे.

0
Vinesh Phogat
Vinesh Phogat

vinesh phogat : भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) हिने ५० किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. मात्र अंतिम सामन्याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. विनेश फोगट ऑलिम्पिकमधून (Olympic) अपात्र (Disqualified) ठरली आहे.

विनेश फोगट ५० किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नसल्याची समोर आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा झाली आहे.

नक्की वाचा : ‘तुझ्या यशाचा गजर दिल्लीपर्यंत पोहोचलाय’;विनेश फोगटसाठी राहुल गांधींची खास पोस्ट

विनेश फोगाटने यूई सुसाकीला लोळवले (Vinesh Phogat )

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश बिगरनामांकित म्हणून दाखल झाली आणि तिला आव्हानात्मक ड्रॉ मिळाला होता. पहिल्याच सामन्यात तिच्यासमोर टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जपानच्या युई ससाकीचे आव्हान होते. पण, २९ वर्षीय भारतीय खेळाडूने सुसाकीला चीतपट केले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत माजी युरोपियन विजेत्या ओक्साना लिव्हाच हिचे आणि उपांत्य फेरीत पॅन अमेरिकन्स स्पर्धेतील विजेती युस्नेलिस गुजमनचे आव्हान परतवून लावले.

अवश्य वाचा : ज्युनिअर एनटीआरसोबत जान्हवी कपूर झाली रोमँटिक;देवरा चित्रपटातील धीरे धीरे गाणं प्रदर्शित

नेमकं काय घडलं ? (Vinesh Phogat )


गेल्या सहा दिवसांपासून विनेश काहीही खात-पित नव्हती. सामन्यापूर्वी तिचे वजन १०० ग्रॅम जास्त होते. ते राखणे तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होते आणि तेच घडले. नियमानुसार स्पर्धेच्या दिवशी खेळाडूने त्याचं वजन कायम राखणे महत्त्वाचे आहेत. मंगळवारी (ता.६) रात्री तिचे वजन दोन किलो अधिक होते. ती संपूर्ण रात्र झोपली नव्हती आणि तिने धावणे, नियमाचे पालन करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले.

विनेश फोगटचे वजन जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून रात्रभर हालचाली सुरु होत्या. मात्र, बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. यानंतर विनेश फोगाटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.  विनेश फोगटने अंतिम फेरी गाठल्यानंतर संपूर्ण भारतात आनंद दिसत होता. परंतु आता विनेशला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याने सर्वत्र निराशा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here