Wrestling Competition : कर्जत : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) अंतर्गत अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समिती व रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांचे संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन मुले कुस्ती स्पर्धा (Wrestling Competition) दादा पाटील महाविद्यालयाच्या जिमखाना विभागात नुकत्याच पार पडल्या.
नक्की वाचा : मोठी बातमी! ‘या’ विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी
उपमहाराष्ट्र केसरी विजय मोढळे यांच्या हस्ते उद्घाटन
या स्पर्धेचे उद्घाटन उपमहाराष्ट्र केसरी विजय मोढळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते. या विजेत्या खेळाडूमधूनच नाशिक विभागीय कुस्तीसाठी संघ निवडला गेला. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या जिमखाना विभागात आंतरमहाविद्यालयीन फ्री स्टाईल कुस्ती व ग्रीको रोमन विविध वजन गटांमध्ये कुस्ती स्पर्धा पार पडल्या. अनेक खेळाडूंनी नेत्रदीपक कुस्ती करीत विजय मिळवला.
अवश्य वाचा : देशात पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार’-नितीन गडकरी
प्रथम व द्वितीय आलेले स्पर्धक पुढीलप्रमाणे (Wrestling Competition)
यात फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय आलेले स्पर्धक पुढीलप्रमाणे: ५७ किलो वजनी गटात अमित कुलाळ (नेवासा) संकेत सतरकर, ६१ किलो वजनी गटात शिवम गरजे (जामखेड) बळवंत ठोंबसे (कोपरगाव), ६५ किलो वजनी गटात ऋषिकेश उचाळे (पारनेर) महेश शेळके (नगर), ७० किलो वजनी गटात कुमार देशमाने (पारनेर) लतेश टकले (नेवासा), ७४ किलो वजनी गटात मयूर तांबे (बुऱ्हाणनगर) रोहित वाघमोडे (जामखेड), ७९ किलो वजनी गटात सौरभ गाडे (जामखेड) सार्थक वाळुंज (पारनेर), ८६ किलो वजनी गटात धुळाजी इरकर (मिरजगाव) संग्राम भिसे (मिरजगाव), ९२ किलो वजनी गटात शशांक बारगुजे (कर्जत) अनिल लोणारे (पाथर्डी), ९७ किलो वजनी गटात भारत होळकर (बुऱ्हाणनगर) लौकिक चौगुले (नगर), १२५ किलो वजनी गटात चेतन रेपाळे (पारनेर) ज्ञानेश्वर यलभर (पिंपळगाव पिसा) यांनी यश संपादन केले. तर ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धेमध्ये विजेते झालेले स्पर्धकांमध्ये ५५ किलो वजनी गटात ओंकार रोडगे (नेवासा) प्रियज करपे (नगर), ६० किलो वजनी गटात प्रदीप मेमाणे (राजुर) हर्षद रोहकले (नगर), ६३ किलो वजनी गटात वैभव क्षीरसागर (श्रीगोंदा) रोशन भोसले, ६७ किलो वजनी गटात अभिजीत वाघुले (नेवासा) आकाश तोरडमल (कर्जत), ७२ किलो वजनी गटात सदगीर भाऊराव (राजुर), स्वप्निल चव्हाण (मिरजगाव), ७७ किलो वजनी गटात शंकर धांडे (मिरजगाव) सुरज चत्तर (नगर), ८२ किलो वजनी गटात पवन रोहकले (पारनेर) प्रताप बरडे (नेवासा), ८७ किलो वजनी गटात गोवर्धन शिंदे (पारनेर) शुभम भागवत (ढवळपुरी), ९७ किलो वजनी गटात ज्योतिरादित्य कंद (श्रीगोंदा) ओम घुले (श्रीगोंदा), १३० किलो वजनी गटात दिग्विजय भोंडवे (श्रीगोंदा) आदित्य धोत्रे (नगर) असे यांनी यश मिळवले.
या यशस्वी खेळाडूमधूनच नाशिक येथे होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागीय कुस्ती स्पर्धेकरीता नगर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला.यावेळी बप्पाजी धांडे, अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाचे सचिव प्रा. राजेंद्र देवकाते, बाळासाहेब साळुंके, पत्रकार गणेश जेवरे, नगर जिल्ह्यातून आलेले शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शांताराम साळवे, डॉ. संजय गायकवाड, डॉ. शरद मगर, डॉ. मनीषा पुंडे, प्रा. कल्पना बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ, प्रा. पवन कडू, प्रा. दिव्या शिलवंत यांनी विशेष परिश्रम घेतले.