Kanni Movie Song : मैत्रीचा अर्थ सांगणारे ‘कन्नी`मधील ‘यारा रे’ गाणे प्रदर्शित

'यारा रे' या गाण्यात एक वेगळाच उत्साह आहे. एनर्जीने भरलेले हे गाणे प्रत्येकाला मित्रांची आठवण करून देणारे आहे. अभिनेत्री ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

0
Kanni Movie Song
Kanni Movie Song

नगर : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) यांची जोडी ‘कन्नी’ चित्रपटाच्या माध्यमातून परत एकत्र दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची देखील पसंती मिळाली. ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच या चित्रपटातील ‘यारा रे’ हे अफलातून गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगला धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा : पोलिस भरतीसाठी आजपासून करता येणार ऑनलाइन अर्ज  

‘कन्नी’ म्हणजे मित्रांची आठवण करून देणारे गाणे (Kanni Movie Song)

‘यारा रे’  या गाण्यात एक वेगळाच उत्साह आहे. एनर्जीने भरलेले हे गाणे प्रत्येकाला मित्रांची आठवण करून देणारे आहे. अभिनेत्री ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या सगळ्यांच्या मैत्रीवर आधारित असलेल्या या गाण्याला जयदीप वैद्य यांचा जबरदस्त आवाज लाभला आहे. तर चैतन्य कुलकर्णी यांनी हे गाणे शब्दबद्ध केले असून एग्नेल रोमन यांनी अप्रतिम संगीत गाण्याला दिले आहे.

अवश्य वाचा : राजस्थान रॉयल्स आयपीएल साठी सज्ज;नवी जर्सी रिलीज   

८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार (Kanni Movie Song)

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. तर अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी ‘कन्नी’चे निर्माते आहेत. येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या गाण्याबद्दल दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात,’यारा रे’ या गाण्यात एक वेगळाच जोश आहे. हे गाणे रेकॉर्डिंग करताना आमच्यातही एक वेगळाच उत्साह  होता. हे गाणे ऐकताना कुठेतरी आपणही आपल्या मैत्रीच्या दिवसांमध्ये रमतो. ‘यारा रे’ गाण्याच्या प्रत्येक शब्दामध्ये मैत्रीची व्याख्या दडलेली आहे. त्यामुळे हे गाणे तरुणाईला विशेष जवळचे वाटेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here