Yashashree Shinde Murder:मोठी बातमी! यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी 

उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील आरोपीला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

0
Yashashree Shinde Murder case
Yashashree Shinde Murder case

Yashashree Shinde Murder: राज्याला हादरवून टाकणाऱ्या उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात (Yashashri Shinde Case) मोठी माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील आरोपीला ७ दिवसांची पोलिस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. आरोपी दाऊद शेखला मंगळवारी (ता.३०) कर्नाटकच्या गुलबर्गा येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्याला(ता.३१) पनवेल सेशन कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याची रवानगी पोलिस कोठडीमध्ये केली. या आरोपीविरोधात ४ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने यशश्रीच्या हत्येची कबुली दिली आहे.

नक्की वाचा : ‘पळून गेलेला बिबट्या परत येतोय त्याला घेऊ नका’- उत्तम जानकर

नवी मुंबई पोलिसांनी मागितला आरोपीचा ताबा (Yashashree Shinde Murder)

या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोपीच्या ताब्याची मागणी केली होती. यावर सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने दाऊदला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाऊदने आपला गुन्हा कबुल केला आहे. दाऊद विरोधात पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता यशश्रीला शिवीगाळ केल्याप्रकरणी दाऊद शेखविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने यशश्रीची हत्या का केली ? त्याचे आणि यशश्री शिंदेचे काय संबंध होते? याबाबत पोलीस चौकशी करणार आहेत.

अवश्य वाचा : नवाब मलिक यांना कोर्टाचा दिलासा;वेेद्यकीय जामीन मंजूर

उज्वल निकम हाताळणार यशश्री शिंदे हत्या प्रकरण (Yashashree Shinde Murder)

यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असून ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम हे यशश्री शिंदे हत्या प्रकरण हाताळणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नवी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी याप्रकरणाची सर्व माहिती त्यांनी घेत चर्चा केली. चर्चा केल्यानंतर त्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याचे सांगितले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here