Yashwant Dange : पातळ प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये : यशवंत डांगे

Yashwant Dange

0
Yashwant Dange
Yashwant Dange

Yashwant Dange : नगर : शासनाने सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर बंदी (Banned) घातलेली असतानाही शहरात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महापालिकेच्या (AMC) पथकाने सिंगल युज प्लास्टिक पिशव्या (Plastic Bag) वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी तेलीखुंट व डाळमंडई येथे कारवाई करार ६० किलो प्लास्टिक जप्त केले. तर १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी दिली.

नक्की वाचा : ‘राम शिंदे ‘सर’असल्याने त्यांना क्लास चालवण्याची सवय’- देवेंद्र फडणवीस

मंत्रालयाने सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली

प्लास्टिकमुळे वाढत असलेल्या प्रदूषणामुळे राज्य शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. अशा प्रकारच्या उत्पादनावरही बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अद्यापही नागरिक, व्यापारी, दुकानदारांकडून सिंगल यूज प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. माझी वसुंधरा अभियानात सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध आणून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेने यापूर्वीही सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर कारवाई केली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. नागरिकांच्या प्रतिसादामुळे महानगरपालिकेला सलग दोन वर्षे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

अवश्य वाचा : जानेवारीत रंगणार मानाची ‘अहिल्यानगर महाकरंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा महापालिकेचा मानस (Yashwant Dange)

आता अहिल्यानगर महानगरपालिकेने माझी वसुंधरा अभियान ५.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये सहभाग घेतला असून या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. आपले शहर सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. त्यादृष्टीने जनजागृती केली जात आहे. सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर कारवाई केली जात आहे. नागरिकांनी पर्यावरणाचा विचार करून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करावा, कागदी अथवा कापडी पिशव्या वापराव्यात, दुकानदार, खाद्यपदार्थ, भाजी विक्रेत्यांनीही सिंगल यूज प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नये, शहर सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.