Yashwant Dange : अतिक्रमण न काढल्याने मनपाची कारवाई – यशवंत डांगे

Yashwant Dange : अतिक्रमण न काढल्याने मनपाची कारवाई - यशवंत डांगे

0
Yashwant Dange : अतिक्रमण न काढल्याने मनपाची कारवाई - यशवंत डांगे
Yashwant Dange : अतिक्रमण न काढल्याने मनपाची कारवाई - यशवंत डांगे

Yashwant Dange : नगर : शहरातील गुलमोहर रस्त्यावरील (Gulmohar Road) अनाधिकृत पत्र्याच्या गाळ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई केली. जेसीबीच्या साह्याने पत्र्याचे गाळे जमीनदोस्त केले. ही कारवाई सोमवारी (ता.१०) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास केली. याबाबत संबंधितांना महापालिका प्रशासनाच्या (AMC) वतीने वारंवार नोटीस देऊनही गाळे खाली करत नसल्याचे महापालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी दिली. 

नक्की वाचा : शहरातील खासगी रुग्णालयांच्या तपासणीत ३२ रुग्णालये दोषी ; महापालिका प्रशासनाने बजावल्या नोटिसा

महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता बांधकाम (Yashwant Dange)

गुलमोहर रस्त्यावरील पारिजात चौकात खासगी जागेत अनधिकृतपणे गाळे बांधल्याप्रकरणी महापालिकेने इक्राम खान तांबटकर यांच्यासह १६ जणांना २०१९ व २०२३ मध्येच नोटिसा बजावल्या होत्या. तेथील १४ अनधिकृत गाळ्यात हिंदुस्थान डेंटींग, एस.एस. फॅब्रीकेशन, डायमंड स्क्रैप, नैशनल कुशन वर्क्स, नैशनल फुटवेअर, अ टू झेड किचन ट्रॉलीज, क्लासिक स्टिल फर्निचर, क्वालिटी इलेक्ट्रीक, पीओपी वर्क, दरबार केटरर्स, सुपर किचन हे व्यवसाय सुरू आल्याचे समोर आले. महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता बांधकाम केले. मुदतीत बांधकाम परवानगी सादर न केल्यास संपूर्ण बांधकाम आपण स्वतः पाडुन टाकावे. अन्यथा मुदतीनंतर महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना आधिनियमअन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यांत येईल,अशी नोटीस बजावली होती. त्यानंतरही अनधिकृत बांधकामे न काढल्याने महापालिकेने ही कारवाई केली.