Yashwant Dange : नगर : महापालिकेने (AMC) महिनाभर अतिक्रमण हटाव मोहिमेचे नियोजन केले आहे. त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे. अतिक्रमणधारकांनी त्यांची अतिक्रमणे त्वरीत काढून घ्यावीत, अन्यथा कारवाईला (Action) सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी दिला आहे.
नक्की वाचा : ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुढील कार्यवाही वेळापत्रकाप्रमाणे सुरूच राहणार
पुढील वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी (ता. २५) रोजी वनविभाग कार्यालय, मेराज मस्जिद रोड पासून कारवाई करत मुकुंदनगसह फकीरवाडा रोडवरील अतिक्रमणेही हटवण्यात आली. टपऱ्या, ओट्यांची पक्की अतिक्रमणे, रस्त्यावर येणारे रॅम्प, पार्किंगसाठी बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड, बेकायदेशीर फलकांवर कारवाई करून हटवण्यात आले.
अवश्य वाचा : मढी ग्रामसभेतील ठरावाचे जिल्हाभर पडसाद
ओपन स्पेसमध्ये पत्राचे शेड टाकून अतिक्रमण (Yashwant Dange)
महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये पत्राचे शेड टाकून अतिक्रमण करण्यात आले होते. जेसीबीच्या साहाय्याने ते जमीनदोस्त करण्यात आले. २७ फेब्रुवारी रोजी पाईपलाईनरोड-डी मार्ट-बंधनलॉन-आठरे पाटील पब्लीक स्कुल तपोवनरोड-भिस्तबाग महाल-नानाचौक-ढवणवस्ती ते जुना पिंपळगांवरोड, २८ फेब्रुवारी रोजी कोठला स्टॅण्ड-डी.एस.पी चौक-छत्रपती संभाजी महाराज रोड-वसंत टेकडी ते इंद्रायणी हॉटेल पर्यंत, ३ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज रोड-फरिस्ट ऑफिस ते बडी मस्जीद-पाण्याची टाकी ते मेराज मस्जीद ते राजनगर, गाडे शाळा- टॉपअप पेट्रोल पंप, ४ मार्च रोजी कोठला स्टॅण्ड-जीपीओचौक-चांदणी चौक-कोठी चौक-मार्केट यार्ड चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक-सक्करचौक-कायनेटीक चौक, ५ मार्च रोजी सक्कर चौक-मल्हार चौक-रेल्वे स्टेशन परिसर-कायनेटीक चौक, ६ मार्च रोजी कायनेटीक चौक-केडगांव-अंबिकानगर बस स्टॉप व केडगांव परिसर, ७ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-चाणक्य चौक-बुरुडगांवरोड-यश पैलेश हॉटेल-आनंदऋषी हॉस्पीटल-चाणक्य चौक-महात्मा फुले चौक ते कोठी, १० मार्च रोजी सक्कर चौक-टिळकरोड-आयुर्वेद कॉलेज-अमरधाम-नेप्तीनाका-कल्याणरोड-रेल्वे उड्डाणपुल या नियोजनानुसार कारवाई करण्यात येणार आहे.