Yashwant Dange : नगर : महापालिकेने (AMC) जानेवारी महिन्यापासून तीन टप्प्यात दिलेल्या शास्ती माफी योजनेमध्ये शहरातील १६ हजार ७२२ मालमत्ता धारकांनी ८ कोटी ८८ लाखांची सवलत घेऊन १७.१६ कोटींचा कर भरला आहे. शास्तीमध्ये ५० टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी वसुली कार्यालये (Recovery Office) व भरणा केंद्र ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ थकीत कराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी केले.
नक्की वाचा : नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड असलेल्या फहिम खानच्या घरावर बुलडोझर
कर वसुलीसाठी कठोर कारवाईचे आदेश
दरम्यान, सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त डांगे यांनी वसुली विभागाला कर वसुलीसाठी कठोर भूमिका घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. थकबाकी दारापर्यंत जाऊन त्यांना सवलतीचा लाभ देऊन कर वसूल करावा, कर न भरल्यास कारवाई करावी, असे आदेश आयुक्त डांगे यांनी दिले आहेत.
अवश्य वाचा : ‘मी खरं सांगितलं असतं तर आमचं सरकारच आलं नसतं’-अजित पवार
मार्च अखेरपर्यंत शास्तीमध्ये ५० टक्के सवलत (Yashwant Dange)
महापालिकेने ८ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत १०० टक्के शास्ती माफ केली होती. तर, २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ७५ टक्के सवलत देण्यात आली होती. मार्च अखेरपर्यंत शास्तीमध्ये ५० टक्के सवलत दिली जात आहे. सवलत काळात थकबाकीदार करदात्यांनी ८.८८ कोटींची सवलत घेऊन १७.१६ कोटींचा कर जमा केला आहे. त्यामुळे एकूण थकबाकीपैकी २६.०७ कोटींची वसुली झाली आहे. चालू आर्थिक वर्षात सुमारे ७७ कोटींची वसुली झाली आहे.