Yashwant Dange : आरोग्य सेवेत आशा सेविकांचे मोठे योगदान : यशवंत डांगे 

Yashwant Dange : आरोग्य सेवेत आशा सेविकांचे मोठे योगदान : यशवंत डांगे 

0
Yashwant Dange : आरोग्य सेवेत आशा सेविकांचे मोठे योगदान : यशवंत डांगे 
Yashwant Dange : आरोग्य सेवेत आशा सेविकांचे मोठे योगदान : यशवंत डांगे 

Yashwant Dange : नगर : अहिल्यानगर महापालिकेतर्फे (AMC) शहरात आरोग्य विषयक अनेक उपक्रम राबवण्यात येतात. यात आरोग्य सेवेसह (Health Services) सर्वेक्ष, उपाययोजना, जनजागृतीमध्ये आशा सेविकांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आशा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अहिल्यानगर शहरात (Ahilyanagar City) महापालिकेच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन आशा सेविकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्यासह सर्वच आशा सेविकांचे (ASHA Workers) कार्य चांगले असल्याचे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी केले.

नक्की वाचा : बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित;विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची घोषणा

आरोग्य केंद्रांसह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांना पुरस्कार

महापालिकेत आज (ता. २५) आशा दिवस साजरा करण्यात आला. तसेच, जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी, आशा सेविकांसाठी क्षयरोग या विषयावर जनजागृतीसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. यातील विजेत्या आरोग्य केंद्रांसह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांना पुरस्कार देण्यात आले. महानगरपालिकेच्या आवारात झालेल्या रांगोळी स्पर्धेतून कर्मचाऱ्यांनी क्षय रोगाबाबत जनजागृती केली.

अवश्य वाचा : माध्यमिक शिक्षक सोसायटीत ‘परिवर्तन’

जनजागृतीसाठी घेण्यात आल्या रांगोळी स्पर्धा (Yashwant Dange)

महापालिकेतर्फे हसीना शेख (मुकुंदनगर), सुनीता भोसले (तोफखाना) व स्वाती भणगे (केडगाव) या तीन आशा सेविकांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. तसेच, रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक केडगाव आरोग्य केंद्राला, द्वितीय क्रमांक महात्मा फुले आरोग्य केंद्राला, तृतीय क्रमांक सिव्हिल (सावेडी) आरोग्य केंद्र, उत्तेजनार्थ जिजामाता आरोग्य केंद्राला देण्यात आला. उपायुक्त प्रियांका शिंदे, सहाय्यक आयुक्त सपना वसावा, कविता माने यांनी या रांगोळी स्पर्धेचे परीक्षण केले.