Yashwant Dange : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात बुद्धिबळ संघटनेचे कार्य उत्तम असून बुद्धिबळ खेळाडू (Chess Player) घडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. या स्पर्धेमुळे अनेक आय. एम, एफ. एम, ग्रँडमास्टर घडले जातील. बुद्धिबळ खेळामुळे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर खेळाला महत्त्व द्यावे लागेल, असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी केले.
नक्की वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारतात पुन्हा सोन्याच्या किंमतीत वाढ
बुद्धिबळ स्पर्धेचे दुसऱ्या सत्राचे उद्घाटन
मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे दुसऱ्या सत्राचे उद्घाटन अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे व राहुरी कृषी विद्यापीठाचे क्रीडा अधीक्षक प्रा. गायकवाड यांनी पटावर चाल देऊन केला, यावेळी ते बोलत होते.
अवश्य वाचा : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ‘हा’ खेळाडू होणार भारताचा कसोटी कर्णधार
खेळाडू पालक मोठ्या संख्येने उपस्थित (Yashwant Dange)
यावेळी सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त श्याम कांबळे, पारुनाथ ढोकळे, प्रकाश गुजराथी, पंच प्रवीण ठाकरे, पवन राणे, शार्दुल टापसे, देवेंद्र ढोकळे, प्रशांत गागरे, अनुराधा बापट, शुभदा ठोंबरे, रोहिणी आडकर आदीसह खेळाडू पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी प्रस्ताविकात संघटने विषयी व स्पर्धेविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी तर सुबोध ठोंबरे यांनी आभार मानले.