Yashwant Dange : नगर : आपल्याला ऐतिहासिक (Historical), धार्मिक, पौराणिक, सांस्कृतिक परंपरा (Cultural Tradition) लाभले असून मित्रमंडळाने देखील समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम केले आहे. शहरातील २४ मंडळांना रोख रक्कम व पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे. मित्र मंडळांनी पुढील काळात डीजे (DJ) मुक्त मिरवणूक सुरू करावी, यासाठी महापालिका सहकार्य करेल. सध्याच्या काळात गणेश उत्सव (Ganesh Utsav) वेगळ्या बाजूला चालला असून आपण सर्वांनी एकत्रित येऊन आपली संस्कृती जोपासण्याचे काम केले पाहिजे. जागरूक नागरिक म्हणून आपण मनपा बरोबर काम केले पाहिजे आपल्या आजूबाजूला समाज विघटक घटना घडत असतात त्यावर लक्ष ठेवून त्या घडू नये यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन मनपा आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी केले.
नक्की वाचा : शेतकऱ्यांना नुकसान होईल, अशी कोणतीही कृती साखर कारखान्यांनी करू नये : जिल्हाधिकारी
गणेश उत्सव देखावा स्पर्धेचे पारितोषिक वितरण
गणेश उत्सव देखावा स्पर्धेचे पारितोषिक वितरण महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपायुक्त प्रियंका शिंदे, सहायक आयुक्त निखिल फराटे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख अशोक साबळे, प्रसिध्दी व सांस्कृतिक विभाग प्रमुख शशिकांत नजान, क्रीडा विभाग प्रमुख व्हिन्सेंट फिलिप्स, परीक्षक अमोल बारसकर आदिसह शहरातील मित्र मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : अनधिकृत फ्लेक्सवर मनपाचा कारवाईचा बडगा; १२ जणांवर गुन्हा दाखल
गणेशोत्सव देखावे स्पर्धेचा निकाल (Yashwant Dange)
समाज प्रबोधनपर देखावे, स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलन, पाणी बचत आदी व इतर समाज प्रबोधनपर देखावे, व्यसनमुक्तीपर देखावे, प्लास्टिक मुक्ती, बेटी बचाओ बेटी पढाओ, जागतिक महामारीवर देखावे : प्रथम क्रमांक – तेलिखुंट तरुण मंडळ (नारी साक्षात अंबिकेचे रूप), द्वितीय क्रमांक (विभागून) – नवग्रह मित्र मंडळ (प्लास्टिकचा भस्मासूर) व छत्रपती शिवाजी आखाडा तरुण मंडळ (वासुदेवाची स्वारी), तृतीय क्रमांक (विभागून) – चौपाटी कारंजा मित्र मंडळ (संस्कार ही अपराध रोख सकता है.. सरकार नाही) व शिवगर्जना मित्र मंडळ (रोबोट)
ऐतिहासिक देखावे : प्रथम क्रमांक – शिववरद प्रतिष्ठान (पावन खिंड), द्वितीय क्रमांक (विभागून) – डाळमंडई तरुण मंडळ (शिवरायांचे गोरक्षण) व जनजागृती मित्र मंडळ (भक्ती शक्ती), तृतीय क्रमांक – जय आनंद महावीर युवक मंडळ (शिवराज्य अभिषेक सोहळा)
धार्मिक व अध्यात्मिक देखावे : प्रथम क्रमांक – नेताजी सुभाष तरुण मंडळ (द्रोणागीरी पर्वत – संजीवनी बुटी), द्वितीय क्रमांक (विभागून) – श्री महावीर प्रतिष्ठान (मार्कंडेय मुनींची कथा) व राजयोग प्रतिष्ठान (योग योगेश्वर शंकर महाराज), तृतीय क्रमांक (विभागून) – आदर्श युवक मंडळ (चांगदेव महाराजांचे गर्वहरण) व नंदनवन मित्र मंडळ (सण नागपंचमीचा)
जिवंत देखावे, सोशल मिडीया व आधुनिक तंत्रज्ञान : प्रथम क्रमांक – सिद्धेश्वर तरुण मंडळ (अफजल खानाचा वध), द्वितीय क्रमांक (विभागून) – जयहिंद तरुण मंडळ (अंधरुन पाहून पाय पसरावे) व सुभाषचंद मित्र मंडळ (व्यसन एक विनाश), तृत्तीय क्रमांक (विभागून) – दोस्ती तरुण मंडळ मंडळ (वेड सेल्फीचं) व संगम तरुण मंडळ (बाप लेक)
गणेश विसर्जन मिरवणुकीत मराठमोळी संस्कृतीची जपवणूक, समाज प्रबोधनपर, शिस्तबध्द व पारंपारिक पध्दतीने मिरवणूक : प्रथम क्रमांक – श्री विशाल गणपती ट्रस्ट, माळीवाडा, द्वितीय क्रमांक – तालयोगी प्रतिष्ठान, सावेडी.
विशेष पारितोषिके : रंगसंस्कृती (रांगोळी ग्रुप), सम्राट तरुण मंडळ (भराडगल्ली)