Yashwant Dange : उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न करणार : आयुक्त यशवंत डांगे

Yashwant Dange : उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न करणार : आयुक्त यशवंत डांगे

0
Yashwant Dange : उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न करणार : आयुक्त यशवंत डांगे
Yashwant Dange : उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न करणार : आयुक्त यशवंत डांगे

Yashwant Dange : नगर : नव्या वर्षात (New Year) महापालिकेकडून अधिक चांगल्या सेवा, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. येत्या वर्षात सध्या सुरू असलेल्या प्रकल्प, योजनांना गती देऊन नाट्यगृह, क्रीडा संकुले, अद्ययावत रुग्णालय, ई-बस सेवा (E-Bus Service), सीना नदी सुशोभीकरण आदी प्रमुख योजना व प्रगतीपथावर असलेली रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा निर्धार महापालिकेने केला असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी म्हटले आहे.

नक्की वाचा : नगर तालुक्यातील ताबेमारीच्या प्रश्नावर व्यापारी आक्रमक

शहरातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना

नवीन वर्षात पदार्पण करताना आयुक्त यशवंत डांगे यांनी आगामी वर्षात राबवायचा योजना, शहरातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना, दैनंदिन सेवा व सुविधा बळकट करण्यासाठी नियोजन, स्वच्छता व कचरा संकलन सेवा बळकट करुन स्वच्छ व सुंदर शहर संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संकल्प केला आहे. सद्यस्थितीत शहरात राज्य सरकारने दिलेल्या व आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून सुमारे दीडशे रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे येत्या वर्षात पूर्ण करून नागरिकांना चांगले रस्ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर भार;शासकीय खर्चाला कात्री

चांगल्या व दर्जेदार सुविधा देण्याचा महापालिकेचा मानस (Yashwant Dange)

नाट्यगृह, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्युझिकल फाऊंटन, सीना नदी परिसर सुशोभीकरण ही कामे प्रगतीपथावर आहेत. रुग्णालयाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. ही कामे पूर्ण करून चांगल्या व दर्जेदार सुविधा, सेवा उपलब्ध करण्याचा महापालिकेचा मानस आहे.
तसेच, अहिल्यानगर शहर स्वच्छ शहर म्हणून विकसित व्हावे, यासाठी दर शनिवारी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. कचरा संकलन व्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रीत करून नागरिकांच्या घरी दररोज घंटागाडी जाईल, यासाठी नियोजन सुरू आहे. यासह माझी वसुंधरा अभियान ५.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२५ प्रभावीपणे शहरात राबवण्यात येणार आहे, असे आयुक्त यांनी म्हटले आहे.