Yashwant Dange : नगर : मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील थकीत मालमत्ता कराचा (Property Tax) भरणा ३१ जानेवारी अखेर केल्यास त्यांना शास्तीमध्ये (Penalty) १०० टक्के सवलत मिळणार आहे. त्यानंतर ता. २८ फेब्रुवारी अखेरपर्यंत कर भरणाऱ्याना शास्तीमध्ये ७५ टक्के व १ ते २२ मार्च अखेर कर भरणाऱ्यांना शास्तीमध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व थकीत कराचा भरणा करावा व कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी केले आहे.
नक्की वाचा : एचएमपीव्ही व्हायरसपासून वाचण्यासाठी काय करावं आणि काय करू नये ?
मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत देण्याचा निर्णय
महापालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर नियमानुसार शास्ती आकारली जात असल्याने नागरिकांच्या मालमत्ता करावरील थकबाकीचा बोजा वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहेमहापालिकेने कराच्या थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात येत आहेत. बहुतांश प्रकरणे लोक आदालतमध्ये घेऊन त्यात तडजोड करून मोठ्या प्रमाणात वसुली केलेली आहे.
अवश्य वाचा : कुकडी-घोड प्रकल्पातून चार आवर्तन सोडण्याचा निर्णय : मंत्री विखे
लोक अदालतच्या माध्यमातून ३५ कोटीची वसुली (Yashwant Dange)
मागील तीन – चार वर्षात महापालिकेने लोक अदालत च्या माध्यमातून सुमारे ३५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. यंदा मार्च महिन्यामध्ये लोकअदालत होणार आहे. मात्र, तत्पूर्वी थकबाकीदारांना संधी देण्याच्या दृष्टीने व महापालिकेची जास्तीत जास्त वसुली होण्यासाठी शास्तीमध्ये तीन टप्प्यात सवलत जाहीर करण्यात आली आहे.