Yashwant Dange : कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात मिळणार अत्याधुनिक सेवा : यशवंत डांगे

Yashwant Dange : कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात मिळणार अत्याधुनिक सेवा : यशवंत डांगे

0
Yashwant Dange : कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात मिळणार अत्याधुनिक सेवा : यशवंत डांगे
Yashwant Dange : कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात मिळणार अत्याधुनिक सेवा : यशवंत डांगे

Yashwant Dange : नगर : महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे दवाखाना (Balasaheb Deshpande Hospital) व सुतिका गृह येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) राबवण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे बाळासाहेब देशपांडे (Yashwant Dange) दवाखाना येथे लवकरच स्त्री रोग व बालरोग विभाग सुरू करून त्या अनुषंगाने विविध उपचार, शस्त्रक्रिया, तपासण्या उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी दिली.

नक्की वाचा : डॉ.व्ही.नारायणन इस्रोचे नवे प्रमुख;१४ जानेवारीला स्वीकारणार पदभार  

शासनाच्या दोन्ही योजना राबविण्यास मान्यता

गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे दवाखाना येथे मोफत रुग्ण सेवा उपलब्ध करून दिली जाते. अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरातील गर्भवती महिलांना या सेवेचा लाभ मिळतो. त्यामुळे या दवाखान्यात महिलांसाठी आणखी आरोग्य सुविधा व सेवा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून दवाखान्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करण्यासाठी, शासनाच्या पॅनलवर दवाखान्याचा समावेश होण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे शासनाने या दोन्ही योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. अ वर्ग रुग्णालय म्हणून उपचारासाठी १०० टक्के पॅकेज दरानुसार या दवाखान्यातून आता सुविधा उपलब्ध होणार आहेत.

अवश्य वाचा :  बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

स्त्रियांसाठी मल्टीस्पेशलिटी सुविधा सुरू करणार (Yashwant Dange)

सद्यस्थितीत दवाखान्यात केवळ सुतीका गृह सुरू आहे. आता रुग्णसेवेचा विस्तार करून, या ठिकाणी स्त्रियांसाठी मल्टीस्पेशलिटी सर्व सेवा सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. स्त्रीरोग विभाग, बालरोग विभाग, मेडिसिन विभाग, सर्जरी विभागाशी संलग्न सेवा, यात आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभाग, विविध शास्त्रक्रिया अशा सर्व सेवा-सुविधा सर्व वयोगटातील महिला रुग्णांसाठी उपलब्ध असणार आहेत. यासह सोनोग्राफी, लॅबोरेटरी, एक्स-रे सुविधा उपलब्ध असणार आहेत. या योजनेसाठी शासनस्तरावर मान्यता मिळाली आहे. या सेवेचा लाभ अहिल्यानगर शहरातील सर्व महिलांनी मिळणार असल्याचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी सांगितले.