Yashwant Dange : नगर : कमीत कमी कालावधीत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणे व कुष्ठरोगाबाबत (Leprosy) समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या (Central and State Government) मार्गदर्शक सूचनांनुसार ३० जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत अहिल्यानगर शहरात “कुष्ठरुग्ण शोध अभियान” ही मोहीम महापालिकेमार्फत (AMC) राबविण्यात येत आहे. कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी सांगितले.
नक्की वाचा : “मी काही साधू संत नाही”; बीडमधून अजित पवार यांचा इशारा
नागरिकांची भेट घेऊन, तपासणी करून जनजागृती करणार
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही मोहिम राबविण्यात येणार असून महापालिका कर्मचाऱ्यांच्या पथकांच्या माध्यमातून विविध घरातील नागरिकांची भेट घेऊन, नागरीकांची तपासणी करून जनजागृती करणार आहे. घरांना प्रभावीपणे भेट देऊन माहिती संकलीत होईल, अशा प्रकारे पथके तयार केली जात आहेत.
अवश्य वाचा : शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का; नाराज १५ नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश
कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल (Yashwant Dange)
या अभियानामुळे समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहूविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे, कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे हे उद्दीष्ठ साध्य करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये नागरिकांनी प्रतिसाद देऊन स्वत:ची कुष्ठरोगाबाबत तपासणी करुन उद्दीष्ट साध्य करण्यात सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे.