Yavat Voilence:दगडफेक,जाळपोळ;यवतमध्ये फेसबुक पोस्टमुळे राडा

0
Yavat Voilence:दगडफेक,जाळपोळ;यवतमध्ये फेसबुक पोस्टमुळे राडा
Yavat Voilence:दगडफेक,जाळपोळ;यवतमध्ये फेसबुक पोस्टमुळे राडा

नगर : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत (Yavat Voilence) गावामध्ये आज (ता.१) सकाळी सोशल मीडियावर पोस्ट (Social Media Post) झालेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे दोन गटांमध्ये जोरदार तणाव निर्माण झाला आहे. या पोस्टवरून दोन्ही गट आमने-सामने आले असून, संतप्त जमावाने दगडफेक (Stone Throwing) करत गावात ठिकठिकाणी टायर जाळल्याची घटना घडली. व्हॉट्सॲप ग्रुपवर एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने हा तणाव वाढला आहे. या घटनेनंतर, यवतमध्ये दोन गटांमध्ये वाद पेटला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचा दिलासा;भारतासह सर्व देशांसाठी टॅरिफचा धोका टळला,नवीन तारीख जाहीर

घरावर दगडफेक, जाळपोळ (Yavat Voilence)

माहितीनुसार, यवत गावातील काही तरुणांनी मशिद तोडल्याचे आणि काही तरुणांच्या घरावर दगडफेक केल्याचे समोर आले आहे. संतप्त जमावाने जाळपोळ करत यवतच्या विविध भागांत जेसीबी गाड्या, कार्यालये अशा अनेक ठिकाणी फोडतोड केली आहे. तसेच दुसऱ्या गटाकडून देखील तणाव निर्माण केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे आठवडे बाजार देखील बंद करण्यात आला.

अवश्य वाचा :  ‘बिन लग्नाची गोष्ट’-नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास;चित्रपटाचा टीझर प्रदर्शित 

यवतमध्ये संग्राम जगताप व गोपीचंद पडळकर यांची हिंदू जनआक्रोश सभा (Yavat Voilence)

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली. तसेच, पोलिसांकडून जमावाला नियंत्रित करण्यासाठी हवेत अश्रुधुराचे नळकांडे सोडण्यात आले विशेष म्हणजे, गुरुवारी (ता.३१) यवतमध्ये गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची हिंदू जनआक्रोश सभा झाली होती. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती यावरचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.

यवतमध्ये तणाव का ?(Yavat Voilence)

यवतमध्ये झालेल्या तणावाचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी नीलकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला होता. यातूनच वातावरण तापले असताना, आता व्हॉट्सॲपवरील आक्षेपार्ह पोस्टने त्यात भर टाकली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करणारा युवक यवत भागातील सहकार नगर भागात राहतो. स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकार नगर भागात धाव घेत त्याच्या घराची तोडफोड देखील केली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या तणावामुळे यवत भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.