Ye Re Ye Re Paisa 3 : नगर : सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या ‘येरे येरे पैसा ३’ (Ye Re Ye Re Paisa 3) या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटातील (Marathi Movies) आणखी एक धमाल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाच्या टीमने शिर्डी येथील साईबाबांच्या (Shirdi Saibaba) मंदिरात जाऊन, आशीर्वाद घेत हे गाणे प्रदर्शित केले. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आणि दोन धमाकेदार गाण्यांनंतर आता प्रदर्शित झालेलं ‘आली रे आली गुलाबाची कळी’ हे गाणे सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. हे गाणे बबलीच्या बिनधास्त, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात तिच्या दिलखेच अदा पाहायला मिळत असून त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. गायिका बेला शेंडे यांच्या सुमधुर आवाजात सादर झालेले हे गाणे, पंकज पडघन यांच्या जबरदस्त संगीताने सजले आहे. गाण्याचे बोल सचिन पाठक (यो) यांनी लिहिले आहेत. तर या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे.
नक्की वाचा : आयुष्मान कार्ड योजनेचा कोणत्या रुग्णांना मिळणार फायदा ? जाणून घ्या सविस्तर…
दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात,
“मनोरंजनाची मेजवानी असलेल्या या चित्रपटात प्रत्येक पात्राची स्वतःची एक ओळख आहे. त्यात बबली सगळ्यांमध्ये खास आहे. ‘आली रे आली गुलाबाची कळी’ हे बबलीचा स्वॅग दाखवणारे गाणे आहे.”
अवश्य वाचा : “शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष!मात्र”…;देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
संगीतकार पंकज पडघन म्हणतात, (Ye Re Ye Re Paisa 3)
“आधीपासूनच चित्रपटातील बबलीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. बबलीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यामुळे या गाण्याला त्याच ताकदीचे संगीत लाभणे आवश्यक होते. गाण्याचे बोल, आवाज, संगीत, नृत्य या सगळ्याची मस्त भट्टी जमून आल्याने हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’’
धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित आणि वर्डविझार्ड एंटरटेनमेंट सहनिर्मित या चित्रपटाचे सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे निर्माते असून सौरभ लालवाणी हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांसारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट येत्या १८ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.