नगर : सध्या सगळीकडे लग्नसराईचा हंगाम सुरू असून लग्नातील हळदी समारंभ हा सर्वात खास आणि धमाल समारंभ असतो. याच वातावरणात,‘फसक्लास दाभाडे’ (Fussclass Dabhade Movie) चित्रपटातील ‘यल्लो यल्लो’ गाणं (yellow yellow song) एक नवा रंग घेऊन आलं आहे. नुकताच दाभाडे कुटुंबियांच्या घरातील हळदी सोहळा मोठ्या दणक्यात पार पडला. यानिमित्ताने ‘यल्लो यल्लो’ हे हळदीचे खास गाणंही प्रदर्शित करण्यात आलं आहे. या सोहळ्यात दाभाडे कुटुंबाने एकत्र येऊन धमाल, मजामस्ती,नाचगाणी आणि विविध खेळ खेळत सोनू आणि कोमलचा हळदी समारंभ अगदी थाटामाटात साजरा केला. या हळदी समारंभाला हेमंत ढोमे, क्षिती जोग, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, राजन भिसे आणि राजसी भावे उपस्थित होते.
नक्की वाचा : भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन होणार! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा
‘यल्लो यल्लो’ गाण्याला अमितराज यांचा स्वरसाज (Fussclass Dabhade Movie)
सोनू आणि कोमलच्या हळदी समारंभातील ‘यल्लो यल्लो’ गाण्यात धमाल पाहायला मिळत असून या गाण्याला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांचे असून या गाण्याने हळदी सोहळ्याचा उत्साह द्विगुणित केला आहे. या धमाकेदार गाण्यात नकाश अझीझ यांच्या आवाजाने अधिकच रंगत आणली आहे. सोनू आणि कोमलच्या हळदीचं हे गाणं प्रत्येकाला थिरकायला लावणारं आहे.
अवश्य वाचा : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम.कृष्णा यांचे निधन
निर्माते भूषण कुमार म्हणतात,‘’हे गाणं म्हणजे आमच्या तुमच्या घरातील लग्नातले चित्रण आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षक स्वतःमध्ये कुठेतरी शोधतील.खूप सुंदर असे सादरीकरण असून प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे आहे.’’
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी गाण्याबद्दल म्हणतात, “हळद हा एक असा सोहळा असतो जिथे मस्ती,आनंद आणि नात्यांचे खेळ रंगतात. पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या सोहळ्याची धमाल ‘यल्लो यल्लो’ गाण्यात पहायाला मिळणार आहे. हे मराठमोळं कौटुंबिक सेलिब्रेशन पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”
२४ जानेवारीला प्रदर्शित होणार चित्रपट (Fussclass Dabhade Movie)
टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत.या चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.