Yoga : शुक्रवारी ‘योग आणि मानसिक स्वास्थ्य’ विषयावर मोफत सेमिनारचे आयोजन

Yoga : शुक्रवारी 'योग आणि मानसिक स्वास्थ्य' विषयावर मोफत सेमिनारचे आयोजन

0
Yoga : शुक्रवारी 'योग आणि मानसिक स्वास्थ्य' विषयावर मोफत सेमिनारचे आयोजन
Yoga : शुक्रवारी 'योग आणि मानसिक स्वास्थ्य' विषयावर मोफत सेमिनारचे आयोजन

Yoga : नगर : स्पर्धा व धावपळीच्या जगात आता मानसिक तानतणाव वाढू लागले आहेत. त्यातून शारीरिक, मानसिक व्याधी, आत्महत्या (Suicide) असे प्रकार वाढत आहेत. यातून कसे बाहेर पडावे यावर लोणावळा योग (Yoga) इंस्टिट्युट (इंडिया)चे अध्यक्ष डॉ. मन्मथ मनोहर घरोटे यांचे मोफत सेमिनार (Free seminars) सावेडीतील माऊली सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. हे सेमिनार शुक्रवारी (ता. १९) सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत होणार आहे.

नक्की वाचा: नगरमधील महारक्तदान शिबिराने केला विक्रम; जिल्ह्याच्या दक्षिण भागातून ३१२४ रक्तपिशव्यांचे संकलन

समाजाला मानसिक स्थैर्य प्राप्त करुन देण्याची गरज

व्यावहारिक जगात जगताना सामान्य माणूस अवाजवी स्पर्था आणि सुखवस्तू जीवनशैली यात भरडला जात आहे. त्यामुळे त्याचे मानसिक स्वास्थ बिघडत चालले आहे. अनेक प्रकारच्या मानसिक व्याधींनी तो हतबल झाला आहे. आज गरज आहे की समाजाला मानसिक स्थैर्य प्राप्त करुन देण्याची. हे मानसिक स्थैर्य आणि स्वास्थ्य मिळवायचे असेल तर संतांनी सांगितलेला परंपरागत योग विषय आत्मसात करणे आवश्यक आहे.

अवश्य वाचा : माेहरम विसर्जन मिरवणूक शांततेत

योग विषयक अनेक गैरसमज (Yoga)

दुर्दैवाने आज समाजात योग विषयक अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे योग विषयाचा उपाय होण्यापेक्षा अपायच होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. समाजातील प्रत्येक वर्गाला स्वयंसिद्ध, सुदृढ आणि स्वावलंबी बनवायचे असेल तर हा मार्ग मानसिक स्थिरत्वामधुनच प्राप्त होऊ शकतो. म्हणुनच योग आणि मानसिक स्वास्थ्य हा विषय योग्य प्रकारे जाणुन घेणे गरजेचे आहे. त्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ. घरोटे यांनी सांगितले आहे.

या मोफत सेमिनारमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश निश्चितीही करता येणार आहे. त्यासाठी https://forms.gle/gHrRb22xhd1ZTkaU7 या लिंकवरून आपण आपला प्रवेश निश्चित करू शकता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here