Yoga : संगमनेरात राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन

Yoga : संगमनेरात राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन

0
Yoga : संगमनेरात राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन
Yoga : संगमनेरात राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन

Yoga : संगमनेर : महाराष्ट्र (Maharashtra) योगासन स्पोर्ट् असोसिएशन व बृहंमहाराष्ट्र योग (Yoga) परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये पाचव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे (State Level Yogasana Competition) आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार 16 ते रविवार 18 ऑगस्ट या कालावधीत होत असलेल्या या स्पर्धेत खेलो इंडिया (Khelo India) व नॅशनल गेम्स् स्पर्धेत विजेत्या खेळाडूंसह राज्यातील एक हजारांहून अधिक योगासन खेळाडू सहभागी होणार आहेत. योगासनांच्या वेगवेगळ्या चार प्रकारांमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत सहभागी खेळाडूंसाठी तीन गट करण्यात आले असून संगमनेरकरांना योगासनांचे थरारक प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळणार आहे.

नक्की वाचा: ‘छगन भुजबळांच्या नादात फडणवीस सत्ता घालवून बसणार’-मनोज जरांगे

प्रतिभावंत खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण

योगासनांना खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यापासून जिल्हास्तरीय योगासन स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेवून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात आले. शाळा, महाविद्यालयांमध्ये योगासनांच्या प्रचार-प्रसारासाठी व्यापक मोहीमही राबवण्यात आली. त्याचा परिणाम आज महाराष्ट्रातील शेकडों प्रतिभावान खेळाडू समोर आले असून गेल्या चार वर्षांपासून खेलो इंडिया व नॅशनल गेम्स् मध्ये महाराष्ट्राच्या संघाने सदैव सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. या क्रीडा प्रकाराचा समावेश एशिया गेम्स् मध्ये करण्यास मान्यता प्राप्त झाली असून ऑलंपिक स्पर्धेतही योगासनांच्या समावेशासाठी प्रयत्न सुरु आहेत.

अवश्य वाचा: महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयावर न्यायालयाचा शिक्कामाेर्तब : मंत्री विखे पाटील

संगमनेरमध्ये सलग पाचव्यांदा ही स्पर्धा पार पडणार

मागील चार वर्षांपासून राज्यस्तरीय योगासन स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळवणार्‍या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्रशस्त कॅम्पसमध्ये सलग पाचव्यांदा ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी सब ज्युनिअर (वय 10 ते 14 वर्ष), ज्युनिअर (वय 14 ते 18 वर्ष) आणि सिनिअर (वय 18 ते 28 वर्ष) असे तीन स्वतंत्र गट करण्यात आले असून पारंपरिक योगासन, कलात्मक योगासन (एकेरी व दुहेरी) आणि तालात्मक योगासन दुहेरी अशा चार प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.


शुक्रवारी (ता.16) सकाळी 8 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. तीन दिवस सकाळी 8 ते सायंकाळी 7 या वेळेत होत असलेल्या या स्पर्धेत खेलो इंडिया व नॅशनल गेम्स् मध्ये सदैव विजेतेपद मिळवणार्‍या खेळाडूंसह राज्यातील 36 जिल्ह्यांमधून एक हजारांहून अधिक प्रतिभावान योगासन खेळाडू सहभागी होत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून संगमनेरकरांना योगासनांची थरारक प्रात्यक्षिकं पाहण्याची संधी मिळणार असून अधिकाधिक योगासन प्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र योगासन स्पोर्ट् असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, सेक्रेटरी राजेश पवार, कोषाध्यक्ष कुलदीप कागडे यांच्यासह बृहंमहाराष्ट्र योग परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here