Yoga : योगासनांचा एशियन गेम्समध्ये समावेश

Yoga : योगासनांचा एशियन गेम्समध्ये समावेश

0
Yoga : योगासनांचा एशियन गेम्समध्ये समावेश
Yoga : योगासनांचा एशियन गेम्समध्ये समावेश

Yoga : संगमनेर : भारतीय परंपरेतील ऋषीमुनींनी निरामय मानवी जीवनासाठी जगाला दिलेल्या योगासनांचा (Yoga) वैश्विक सन्मान करण्यात आला असून आता योगासन क्रीडेचा समावेश एशियन गेम्समध्ये (Asian Games) झाला आहे. ऑलिंपिक (Olympics) कौंसिल ऑफ एशियाचे अध्यक्ष पटियाला महाराज राजा रणधीरसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विषयी मांडलेल्या प्रस्तावाला उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात एकमताने मान्यता दिली. यावेळी संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमधील पाच विद्यार्थीनींनी योगासनांच्या सहा प्रकाराचे सादरीकरण केले. हा क्षण भारतीय (Indian) पारंपरिक योगासनांसाठी ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया एशियन योगासन महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी दिली.

Yoga : योगासनांचा एशियन गेम्समध्ये समावेश
Yoga : योगासनांचा एशियन गेम्समध्ये समावेश

नक्की वाचा: विदर्भात पावसाचे थैमान! हवामान विभागाकडून अलर्ट जारी

स्पर्धांच्या माध्यमातून योगासनांमधील प्रतिभावान खेळाडू समोर

राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांच्या माध्यमातून योगासनांमधील प्रतिभावान खेळाडू समोर आल्यानंतर या खेळाचा समावेश एशियन आणि ऑलिंपिक खेळांमध्येही व्हावा यासाठी प्रयत्न सुरु होते. त्या पार्श्वभूमीवर रविवारी दिल्लीतील भारत मंडपम् मध्ये पटियाला नरेश राजा रणधीरसिंह यांच्या अध्यक्षतेखाली ऑलिंपिक कौंसिल ऑफ एशियाची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. या सभेला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविय, राज्यमंत्री रक्षा खडसे, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी.टी.उषा आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

अवश्य वाचा: मोठी बातमी! मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार

योगासनांच्या वेगवेगळ्या सहा प्रकारांचे उत्कृष्ट सादरीकरण (Yoga)

बैठकीच्या सुरुवातीला विविध स्पर्धांच्या माध्यमातून योगासनांमध्ये नैपूण्य प्राप्त करणार्‍या महाराष्ट्र संघातील संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमधील पाच मुलींसह गुजरात व हरियाणातील एकूण 15 मुलींनी योगासनांच्या वेगवेगळ्या सहा प्रकारांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. जवळपास 45 मिनिटे चाललेल्या या कार्यक्रमात प्रत्येक आसनाच्या सादरीकरणानंतर एशियन योगासन महासंघाचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी त्याबाबतची इंत्यभूत माहिती दिली. वर्ल्ड योगासन महासंघाचे अध्यक्ष योगऋषी स्वामी रामदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली योगासनांचा खेळात समावेश करताना त्याची मूळ धारणा कायम राखण्यास मोठी मदत झाली. महासचिव, योगाचार्य डॉ.जयदीप आर्य, उपाध्यक्ष उदित सेठ, एशियन योगासन महासंघाचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, महासचिव उमंग डॉन यांच्यासह एशियन व योगासन भारतच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळेच हा ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

दिल्लीच्या भारत मंडपम् मध्ये पार पडलेल्या ऑलिंपिक कौन्सिल ऑफ एशियाच्या सर्वसाधारण बैठकीसमोर भारतीय योगासनांचा परिचय करुन देताना महाराष्ट्र, हरयाणा व गुजरातच्या प्रत्येकी पाच मुलींनी योगासनांच्या सहा प्रकारांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. एशियन योगासन महासंघाचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी योगासनांची परिपूर्ण माहिती दिली. यावेळी सादर झालेल्या योगासनांच्या प्रात्यक्षिकांमध्ये संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमधील स्वरा संदीप गुजर, युगांका किशोर राजम, रुद्राक्षी पंकज भावे, प्रांजल सोमनाथ व्हन्ना व गीता सारंग शिंदे या योगासन खेळाडूंचा समावेश होता.