Yoga : विभागीय योगासन स्पर्धेत ध्रुव ग्लोबलचे यश

Yoga : विभागीय योगासन स्पर्धेत ध्रुव ग्लोबलचे यश

0
Yoga : विभागीय योगासन स्पर्धेत ध्रुव ग्लोबलचे यश
Yoga : विभागीय योगासन स्पर्धेत ध्रुव ग्लोबलचे यश

Yoga : संगमनेर: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे पार पडलेल्या एस.जी.एफ.आय. विभागीय योगासन स्पर्धेत (Yoga competition) संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने (Dhruv Global School) घवघवीत यश मिळवले. योगासनांच्या (Yoga) तीन प्रकारांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत उत्तम सादरीकरण करताना ध्रुव ग्लोबलच्या योगासनपटुंनी नऊ सुवर्ण, सात रौप्य आणि चार कांस्य पदकांसह एकूण 20 पदकांची कमाई करीत ही स्पर्धा गाजवली.

नक्की वाचा: शरद पवारांची सुरक्षा वाढणार, झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह

कलात्मक एकेरी प्रकारात श्रद्धा देसाईला सुवर्णपदकं

चौदा वर्षांखालील मुलींच्या गटातील कलात्मक एकेरी प्रकारात श्रद्धा देसाईने सुवर्णपदकं मिळवले. तर, पारंपरिक प्रकारात तृप्ती डोंगरे व तालात्मक एकेरी प्रकारात हिंदवी चौरे यांना रौप्यपदकं मिळाली. मुलांच्या याच वयोगटात कलात्मक एकेरी प्रकारात तन्मय म्हाळसकरने रौप्यपदकं पटकावले. 17 वर्षांखालील मुलींच्या गटात रिद्धी लगड, वैदेही मयेकर व सिद्धी लगड यांनी पारंपरिक प्रकारात रौप्य मिळवले. या वयोगटात योगासनांचे सुंदर सादरीकरण करताना कलात्मक एकेरी प्रकारात रिद्धी लगड तर, तालात्मक एकेरी प्रकारात सिद्धी लगड या दोघी बहिणींनी रौप्यपदकं मिळवताना आपली छाप सोडली.

अवश्य वाचा: दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल, विषयांची संख्या वाढणार

मुलींच्या गटातही ध्रुवच्या स्पर्धकांचा बोलबाला (Yoga)

एकोणावीस वर्षांखालील मुलींच्या गटातही ध्रुवच्या स्पर्धकांचा बोलबाला बघायला मिळाला. या गटातील पारंपरिक एकेरी प्रकारात रुद्राक्षी भावेने सुवर्ण तर, युगांका राजमने रौप्य पदकाची कमाई केली. याच वयोगटातील कलात्मक योगासनांमध्येही युगांकाला कांस्यपदक मिळाले. तालात्मक एकेरी प्रकारात स्वरा गुजरने सुवर्ण पदकाला गवसणी घालताना ध्रुव ग्लोबलच्या यशाचा आलेख उंचावत नेला. मुलींप्रमाणेच मुलांनीही बाजी मारीत याच वयोगटातील कलात्मक प्रकारात यश लगडने सुवर्ण तर, पारंपरिक योगासनांमध्ये मिलन वागाद्रे याला सुवर्ण व प्रीत बोरकरला कांस्यपदक मिळाले.


मुलांच्या या वयोगटातील तालात्मक एकेरी प्रकारातही मिलन वागाद्रेने सुवर्ण पदकं मिळवताना ही स्पर्धा गाजवली. या स्पर्धेत तीनही गटात उत्कृष्ट सादरीकरणाच्या बळावर ध्रुव ग्लोबल स्कूलला 9 सुवर्ण, 7 रौप्य व 4 कांस्य अशी एकूण 20 पदकं मिळाली. योग प्रशिक्षक विष्णू चक्रवर्ती, प्रवीण पाटील व काजल ताजणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विभागीय योगासन स्पर्धेत मिळालेल्या या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.