Yoga : नगर : जीवनशैली बिघडल्याने अनेक आजारांचा सामना महिलांना करावा लागत आहे. निरोगी जीवनासाठी महिलांना नियमित व्यायाम (Exercises) करणे गरजेचे बनले आहे. व्यायाम व योगाने मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहते. नियमित योगाने (Yoga) दिनचर्या प्रसन्न बनते. व्यायामासाठी वयाचे बंधन नसते, तर वेळ नसला तरी वेळ काढावा लागतो. महिलांनी कुटुंब सांभाळताना, आरोग्य देखील सांभाळल्यास कुटुंब व समाज निरोगी आणि सुदृढ होणार असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक शीतल जगताप (Sheetal Jagtap) यांनी केले.
नक्की वाचा : महिला ग्रामसभेत दारू दुकान गावाबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय
महिलांच्या स्वास्थ्य जागरुकता उपक्रमाने महिला दिन साजरा
सारसनगर येथील एम. एम. ए. मॅट्रिक्स जिम व टिम ५७ यांच्या वतीने महिलांच्या स्वास्थ्य जागरुकता उपक्रमाने महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिलांसाठी सूर्यनमस्कार, योगा व विविध स्पर्धा पार पडल्या. या कार्यक्रमातून महिलांना सदृढ आरोग्याचा संदेश देण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
अवश्य वाचा : शिव्या बंदीच्या शासन निर्णयासाठी सरपंच आरगडे यांचे उपोषण
महिला मोठ्या संख्येने उपस्थित (Yoga)
यावेळी योगिता पर्वते, गीता पर्वते, मनीषा पर्वते, एकता पर्वते, प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलका मुंदडा, सुषमा साळुंके, सुनंदा मुळे, हेमा पडोळे, उषा सोनी, सुरेखा चेमटे, सुनीता कोळी, लीला अग्रवाल, उषा सोनटक्के, मेघना मुनोत, श्रध्दा उपाध्ये, नंदा पुरोहित, सीमा बंग आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.