Yoga Festival : शिर्डीत योग महोत्सव उत्साहात

Yoga Festival : शिर्डीत योग महोत्सव उत्साहात

0
Yoga Festival : शिर्डीत योग महोत्सव उत्साहात
Yoga Festival : शिर्डीत योग महोत्सव उत्साहात

Yoga Festival : राहाता : श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट (Shri Saibaba Sansthan Trust), शिर्डी व प्रकृती मंथन (Prakriti Manthan), दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने द्वारावती भक्तनिवास गार्डन येथे “योग महोत्सव (Yoga Festival) – प्रकृती मंथन” हा उपक्रम उत्साहात पार पडला. श्री साईबाबांच्या कृपाछायेत व निसर्गरम्य वातावरणात झालेल्या या महोत्सवाला योगसाधक, साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अवश्य वाचा: पर्यटकांना फोटो किंवा सेल्फीसाठी त्रास दिल्यास होणार कारवाई

Yoga Festival : शिर्डीत योग महोत्सव उत्साहात
Yoga Festival : शिर्डीत योग महोत्सव उत्साहात

उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन

योग म्हणजे केवळ व्यायाम नसून शरीर, मन व आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनशैली असल्याचे प्रतिपादन या कार्यक्रमातून करण्यात आले. योगासन, प्राणायाम, ध्यान, नैसर्गिक चिकित्सा तसेच आरोग्यदायी व तणावमुक्त जीवनशैलीविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.या माध्यमातून सकारात्मक विचारसरणी व नैसर्गिक उपचारपद्धतीचा प्रभावी संदेश देण्यात आला. या योग महोत्सवात योगतज्ज्ञ मंजू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले.

नक्की वाचा: टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या त्या पत्रावरून आदित्य ठाकरेंचा संताप!

योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल करण्याचा संदेश (Yoga Festival)

यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, द्वारावती विभागप्रमुख योगेश गोरक्ष, विविध विभागांचे अधीक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.समाजाला रोगमुक्त, तणावमुक्त व नैसर्गिक जीवनशैलीकडे प्रवृत्त करणे हा या योग महोत्सवाचा मुख्य उद्देश असून, योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.