Yogiraj Gade : हिंदूंना दिवाळीचा सण जल्लोषात साजरा करू द्या : योगीराज गाडे

Yogiraj Gade : हिंदूंना दिवाळीचा सण जल्लोषात साजरा करू द्या : योगीराज गाडे

0
Yogiraj Gade : हिंदूंना दिवाळीचा सण जल्लोषात साजरा करू द्या : योगीराज गाडे
Yogiraj Gade : हिंदूंना दिवाळीचा सण जल्लोषात साजरा करू द्या : योगीराज गाडे

Yogiraj Gade : नगर : पर्यावरणाचे रक्षण (Environmental Protection) करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, परंतु आजकाल काही स्वयंघोषित पर्यावरण प्रेमी फक्त हिंदूंच्या सणांच्या वेळीच “पर्यावरण जागरूकता” दाखवतात. दिवाळी (Diwali) आली की लगेच प्रदूषण, फटाके, धूर अशा विषयांवर भाष्य केलं जातं, पण वर्षभर वाहनांच्या धुरामुळे, औद्योगिक कारखान्यांमुळे आणि जगभरात न्यू इयरच्या दिवशी होणाऱ्या फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे कोणीच पाहत नाही, असा आरोप ही माजी नगरसेवक योगीराज गाडे (Yogiraj Gade) यांनी केला आहे. 

अवश्य वाचा : शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठाण;गुन्हा दाखल

फक्त दिवाळीच्या वेळीच पर्यावरणाचे भान दाखवणं योग्य नाही (Yogiraj Gade)

हिंदूंचे सण हे आनंद, परंपरा आणि संस्कृती यांचं प्रतीक आहेत. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, सकारात्मकतेचा आणि एकतेचा उत्सव. आपल्या संस्कृतीला बदनाम करण्याचा प्रयत्न म्हणून प्रत्येक वर्षी फक्त दिवाळीच्या वेळीच “पर्यावरणाचे भान” दाखवणं योग्य नाही. पर्यावरणाची काळजी घ्यावी. हिंदूंना त्यांच्या परंपरेप्रमाणे सण जल्लोषात आणि अभिमानाने साजरा करू द्या, असे त्यांनी म्हटले आहे.