Young Innovators Science Exhibition : अहिल्यानगरमध्ये यंग इनोव्हेटर्स सायन्स एक्झिबिशनचे आयोजन

Young Innovators Science Exhibition

0
Young Innovators Science Exhibition : अहिल्यानगरमध्ये यंग इनोव्हेटर्स सायन्स एक्झिबिशनचे आयोजन
Young Innovators Science Exhibition : अहिल्यानगरमध्ये यंग इनोव्हेटर्स सायन्स एक्झिबिशनचे आयोजन

Young Innovators Science Exhibition : नगर : रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाउन (Rotary Club Of Ahmednagar Midtown) आणि जे. जे. सायन्स अकॅडमी (J. J. Science Academy) यांच्या संयुक्त विद्यमाने यंग इनोव्हेटर्स सायन्स एक्झिबिशन (Young Innovators Science Exhibition) २२ व २३ ऑगस्ट २०२५ रोजी अहिल्यानगरच्या सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्यावरील मायसिनेमाजवळील मेरीलँड बँक्वेट हॉल येथे भव्यदिव्य आयोजित करण्यात आलेले आहे अशी माहिती रोटरी मिडटाऊनचे डॉ विनोद मोरे व जे जे ॲकॅडमीचे कृष्णकांत झा यांनी दिली.

नक्की वाचा : नगर परिषदांचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर

२३० हून अधिक विद्यार्थी नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करणार

या प्रदर्शनात राज्य बोर्ड व सीबीएसई बोर्डाच्या ८वी, ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असून एकूण २८ नामांकित शाळा सहभागी होत आहेत. यात भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, सेंट मायकेल स्कूल, त्रिमूर्ती इंटरनॅशनल स्कूल, नालंदा पब्लिक स्कूल, तक्षशिला स्कूल, ऑक्सिलियम स्कूल, कॉन्व्हेंट स्कूल, केंद्रीय विद्यालय आदी नामांकित शाळांचा समावेश आहे. या माध्यमातून २३० हून अधिक विद्यार्थी त्यांच्या विज्ञानातील प्रतिभा, सृजनशीलता व नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करणार आहेत.

अवश्य वाचा : पाथर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर

प्रत्येक शाळेला सहभाग ट्रॉफी (Young Innovators Science Exhibition)

पर्यावरण आणि शाश्वतता, रसायनशास्त्र व दैनंदिन विज्ञान, भौतिकशास्त्र व अभियांत्रिकी, जीवशास्त्र व आरोग्य, अवकाश व खगोलशास्त्र हे प्रदर्शनाचे विषय आहेत. विद्यार्थी एक विषय निवडू शकतात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक पारितोषिके ठेवली आहेत, सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच प्रत्येक शाळेला सहभाग ट्रॉफी प्रदान केली जाईल.

या प्रदर्शनात डॉ. बाळासाहेब गायकवाड (जीवशास्त्र), डॉ. दत्ता पोंदे (रसायनशास्त्र), प्रा. व्ही. के. धस (भौतिकशास्त्र) हे परीक्षण करणार आहेत. हे प्रदर्शन सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना व विज्ञानातील प्रयोग पाहण्याची ही एक उत्कृष्ट संधी ठरणार आहे. या उपक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाउन व जे. जे. सायन्स अकॅडमी यांच्या वतीने करण्यात आले असून विद्यार्थ्यांमध्ये नाविन्य, जिज्ञासा व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. यावेळी रोटरी चे सचिव महेश गोपालकृष्णन, रो. डॉ प्रसाद उबाळे, रो मार्लिन एलिशा, रो टीना इंगळे, जे.जे. अॅकॅडमीचे संतोष मिश्रा उपस्थित होते. रो डॉ प्रसाद उबाळे यांनी सर्वांचे आभार मानले.