Youth Festival : कर्जत : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University), पुणे (Pune) विद्यार्थी विकास मंडळ आणि शारदाबाई पवार महिला महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जल्लोष’ युवक महोत्सवामध्ये (Youth Festival) दादा पाटील महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवले. यात महाविद्यालयाच्या एकूण ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
नक्की वाचा: अखेर आमदार अपात्रता प्रकरणाला मुहूर्त;’या’दिवशी होणार सुनावणी
सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्यांचे मार्गदर्शन (Youth Festival)
या महोत्सवात शास्त्रीय गायन विभागात प्रियंका वाघमारे (प्रथम), स्वरवाद्य नुपूर केदार लहाडे (द्वितीय), तालवाद्य सौरभ विठ्ठल खामगळ(तृतीय), फोटोग्राफी विकास बिडगर (द्वितीय), नकला-मिमीक्र प्रकाश दत्तु शिंदे (द्वितीय), वक्तृत्व रोहिणी संजय भुते (तृतीय), मातीकाम प्रसाद काळे (तृतीय) आणि रांगोळी विभागात प्रणाली मंगेश भारती (द्वितीय) या आठ दादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळवली. या यशस्वी विद्यार्थ्यांचा रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर नवनाथ बोडखे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय नगरकर यांनी सत्कार केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. संजय नगरकर, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. स्वप्निल म्हस्के, डॉ. प्रतिमा पवार व सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्यांचे मार्गदर्शन लाभले.