Youth Festival : नगर : जिल्हा क्रीडा अधिकारी (District Sports Officer) कार्यालय व नेहरू युवा केंद्र यांच्यामार्फत सीएसआरडी (CSRD) समाजकार्य महाविद्यालय येथे ता. ५ व ६ डिसेंबर रोजी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे (Youth Festival) आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात सहभागासाठी ता. ३ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर यांनी केले आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी! ‘या’ विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी
युवकांसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात येणार
या जिल्हास्तर युवा महोत्सवात संकल्पना आधारित बाबींमध्ये ‘विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना’ हा विषय आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत समूह लोकनृत्य, लोकगीत, तसेच कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, कविता लेखन, तसेच साहसी उपक्रम, आरोग्य, युवकांसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांची यूथ आयकॉन म्हणून निवड करण्यात येणार आहे.
अवश्य वाचा : देशात पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार’-नितीन गडकरी
राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी (Youth Festival)
जिल्हास्तर युवा महोत्सवात प्रावीण्य प्राप्त केलेला संघ आणि युवा कलाकार यांना प्रावीण्य प्राप्त केल्यानुसार विभागस्तरावर आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. त्यानुसार विभागावर प्रावीण्य प्राप्त झाल्यास राज्यस्तरावर व राज्यस्तरावरून प्रावीण्य प्राप्त केल्यास राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे. तसेच प्रत्येक स्तरावर प्रावीण्य प्राप्त झाल्यास शासनाकडून प्रावीण्य प्राप्त युवा कलाकार किंवा युवा संघास रोख पारितोषिक, सहभाग व प्रावीण्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
जिल्हा युवा महोत्सवात १२ जानेवारीपर्यंत वय १५ ते २९ वर्षे असलेले युवक व युवती सहभागी होवू शकतील. जन्मतारखेबाबत सबळ पुरावा म्हणून जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचा रहिवासी असल्याबाबत आधारकार्ड किंवा रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे.