Firing On School Van:मोठी बातमी!उत्तर प्रदेशात स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

0
Firing On School Van:मोठी बातमी!उत्तर प्रदेशात स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार
Firing On School Van:मोठी बातमी!उत्तर प्रदेशात स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

नगर : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एक हादरून टाकणारी घटना समोर आली आहे. अमरोहा (Amroha) येथे आज स्कूल व्हॅनवर गोळीबार (Firing) आणि दगडफेकीची मोठी घटना घडली. यावेळी चार अनोळखी तरुणांनी गोळीबार करत स्कूल व्हॅनवर दगडफेक केली. गोळीबार होत असल्याचे पाहून व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांनी आरडाओरडा सुरू केला. हल्ला होत असल्याचे पाहून चालकाने व्हॅन वेगाने पळवत सुरक्षित ठिकाणी नेली. दरम्यान स्कूल व्हॅनमध्ये इयत्ता चौथीची मुले प्रवास करत होती.

नक्की वाचा : ‘संगमनेर तालुक्यात मी दहशत केली यांचं उदाहरण दाखवा’-बाळासाहेब थोरात  

बस चालकाच्या सावधानतेमुळे वाचले मुलांचे प्राण (Firing On School Van)

घटनाप्रसंगी बस चालकाने शहाणपण दाखवत गोळीबार करणाऱ्या लोकांपासून व्हॅन शाळेपर्यंत नेली आणि मुलांचे प्राण वाचवले. स्कूल बसवर गोळीबार झाल्याच्या वृत्तामुळे अमरोहा शहरात भीतीचे वातावरण आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांचे पथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू झालेल्या एसआरएस इंटरनॅशनल स्कूलमध्ये ही घटना घडली आहे.

अवश्य वाचा : मोठी बातमी!बारावीची ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून बोर्डाची परीक्षा

नेमकं काय घडलं ? (Firing On School Van)

एसआरएस इंटरनॅशनल स्कूलच्या मिनी व्हॅनवर गोळीबार झाला आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून बसमध्ये असलेली मुले आणि कर्मचारी यांनी आरडाओरडा सुरू केला. तब्बल २८ मुले व्हॅनमधून शाळेत येत होती. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चौधरी वीरेंद्र सिंह हे शाळेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांचा पुतण्या पुनीत सिंह हा शाळेचा संचालक आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गोळीबाराच्या घटनेचा आढावा घेतला. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू केला. हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या घटनेनंतर सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, स्थानिक आमदार आणि प्रशासनानेही या घटनेचा निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here