Zee Marathi New Serial:’झी मराठी’ने केली नव्या मालिकेची घोषणा; मालिकेचा फर्स्ट लूक आला समोर

आषाढी एकादशीच्या निमित्ताने 'झी मराठी वाहिनी'ने नव्या मालिकेची घोषणा केली आहे. या नव्या मालिकेचा फर्स्ट लूक आज लाँच करण्यात आला आहे.

0
Zee Marathi New Serial:'झी मराठी'ने केली नव्या मालिकेची घोषणा; मालिकेचा फर्स्ट लूक आला समोर
Zee Marathi New Serial:'झी मराठी'ने केली नव्या मालिकेची घोषणा; मालिकेचा फर्स्ट लूक आला समोर

Zee Marathi नगर : सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सगळ्या वाहिन्यांकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘झी मराठी वाहिनी’ने (Zee Marathi) आपल्या नव्या मालिकेची (New serial) घोषणा केली आहे. या नव्या मालिकेचा फर्स्ट लूक आज लाँच (First Look Relese) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : ‘विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव’;मुख्यमंत्र्यांचे विठुरायाचरणी साकडे 

‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेची झी मराठीकडून घोषणा (Zee Marathi New Serial)

आषाढी एकादशीच्या निमित्ताने झी मराठी वाहिनीने आपल्या नव्या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ असे या नव्या मालिकेचे नाव आहे. झी मराठीने पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. मागील काही महिन्यात झी मराठीवर नव्या मालिकांचा धडाका सुरू आहे. आयपीएलच्या काळातही झी मराठीने नव्या मालिका लाँच करण्याचे धाडस दाखवले आणि प्रेक्षक खेचण्यास यश मिळवले. ‘शिवा’,‘पारू’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ‘लाखात एक आमचा दादा’ आदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या मालिकांना सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अवश्य वाचा : आषाढीसाठी पंढरपूर प्रशासन अलर्ट मोडवर;चंद्रभागेच्या तिरी वारकऱ्यांची गर्दी

मालिकेत नेमके काय ? (Zee Marathi New Serial)


‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका विठ्ठलाच्या भक्तीवर आधारीत असल्याचे दिसते. या टीझरमध्ये एक मुलगी पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होऊन मोठ्या भक्तीभावाने आराधना करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओ सोबत “पांडुरंगाची परमभक्त ती, सुरेल तिचा गळा, तुम्हालाही लागेल तिच्या गोड आवाजाचा लळ ‘सावळ्याची जणू सावली’ ही नवीन मालिका येतेय लवकरच आपल्या भेटीला” अशी कॅप्शन देण्यात आले आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार, याची उत्सुकता लागली आहे. मात्र, या मालिकेच्या प्रसारणाला आणखी काही अवधी असणार असल्याची माहिती समोर आली आहे. आषाढी एकादशीच्या चांगल्या दिवसाच्या निमित्ताने मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. मात्र झी मराठीवर या नव्या मालिकेसाठी कोणता टाईमस्लॉट दिला जाणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here