नगर : बिग बॉस मराठी सिझन ५ चा विनर ठरलेल्या सूरज चव्हाणने (Suraj Chavhan) लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत.आता पुन्हा एकदा तो आपला जलवा दाखवायला सज्ज आहे. सूरज चव्हाण लवकरच “झापुक झुपूक”(Zapuk Zupuk) ह्या त्याच्या पहिल्या मराठी सिनेमात दिसेल. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित,निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ.बेला शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित “झापुक झुपूक” चा धमाकेदार टिझर आज प्रदर्शित (Teaser Relesed) झाला आहे.
नक्की वाचा : अखेर अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची उद्या घरवापसी
“झापुक झुपूक” च्या टीझरमध्ये काय ?(Zapuk Zupuk Movie)
“झापुक झुपूक” च्या टीझरमध्ये सूरजचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे. ज्यात तो ‘म्हणतो मार्केट गाजवायला आणि पोरीला लाजवायला सूरज चव्हाणच्या नजरेतच दम आहे’, असाच त्याच्या “झापुक झुपूक” सिनेमाचा टिझर आहे. या टिझरमध्ये चित्रपटाची थोडीशी झलक पाहायला मिळत आहे. सूरजची कॉमेडी, हटके स्टाईल,त्याचा भन्नाट अभिनय आणि फुल्ल ऑन मनोरंजन सिनेमामध्ये अनुभवायला मिळणार आहे. हलाखीच्या परिस्थितीतून वर येऊन सूरज ने प्रसिद्धी मिळवत माणुसकी जपली. त्याची अकल्पनीय आणि प्रशंसनीय मेहनत आता मोठ्या पद्यावर पाहायला मिळणार आहे. एका ग्रामीण भागातील हा मुलगा त्याच्या चित्रपटासाठी सध्या भरपूर चर्चेत आहे.
‘झापुक झुपूक’ चित्रपटात ‘हे’ कलाकार झळकणार (Zapuk Zupuk Movie)

सूरज चव्हाणसोबत या चित्रपटात जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हल्लीच सूरजने जेजुरीच्या खंडोबा देवाचे, आईमरी मातेचे आणि मोरगावच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेत सिनेमाच्या प्रमोशनची जोरदार सुरुवात केली आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शित “झापुक झुपूक” हा सिनेमा येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रातील सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.