Zilla Parishad School : जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळाले संगणक भेट 

कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सटाले वस्ती व हनुमाननगर येथील शाळांना पुणे येथील पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी यांनी संगणक संच भेट दिलेत.

0
जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळाले संगणक भेट

कर्जत : तालुक्यातील निमगाव गांगर्डा (Nimgaon Gangarda) येथील सटाले वस्ती व हनुमाननगर येथील शाळांना पुणे येथील पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी यांनी संगणक संच भेट दिलेत. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचे धडे मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या संस्थेकडून ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad School) शाळांमध्ये शिकणाऱ्या लहान मुलांना २० संगणक भेट देण्यात आले.

नक्की वाचा : दिवाळी फराळ आणि राजकीय गुऱ्हाळ

 जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळेतील व्यवस्थापन समिती व शिक्षक यांच्याकडून राबविण्यात येत असलेला ‘एक हात मदतीचा’ हा लोकसहभागावर आधारित एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी शासन व प्रशासनावर अवलंबून राहण्यापेक्षा लोकसहभागातून शक्य त्या गरजा पूर्ण करून शाळेतील विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याची माहिती तालुका गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांनी दिली.

अवश्य वाचा : व्हॉट्सॲप युजर्ससाठी नवीन फिचर येणार

याच उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांची संगणकाची गरज नुकतीच पूर्ण करण्यात आली. संचालक डॉ. पी. टी. कुलकर्णी, प्राचार्य एस. टी. गंधे यांना येथील शाळेतील शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाची गरज असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने या शाळेला स्वखर्चातून संगणक संच भेट स्वरूपात दिले. महेश गांगर्डे यांच्या प्रयत्नातून तसेच सहशिक्षक नवनीत गायकवाड व जालिंदर गोरे यांनी संगणक संचासाठी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here