ZP : झेडपीचे ५२ कोटी ५४ लाखांचे अंदाजपत्रक सादर

ZP : झेडपीचे ५२ कोटी ५४ लाखांचे अंदाजपत्रक सादर

0
ZP : झेडपीचे ५२ कोटी ५४ लाखांचे अंदाजपत्रक सादर
ZP : झेडपीचे ५२ कोटी ५४ लाखांचे अंदाजपत्रक सादर

ZP : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा परिषदेचे (ZP) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे ५२ कोटी ५४ लाख ९० हजार ४२६ रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर (Ashish Yerekar) यांनी अंदाजपत्रक जाहीर केले. यात जिल्हा परिषद शाळेत ओपन सायन्स पार्क उभारणी, मिशन आरंभ, सुरभि सुरक्षा अभियानासह ड्रोन फवारणी यंत्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इमारतीवर सौर ऊर्जा (Solar Energy) प्रणाली स्थापित करणे यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

दुध दरात दोन रुपयांनी वाढ;’या’दिवशीपासून लागू होणार नवे दर

अधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, दादाभाऊ गुंजाळ, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू लाकूडझोडे, लेखाधिकारी योगेश आंबरे, महेश कावरे, डॉ बापुसाहेब नागरगोजे, मनोज ससे, भास्कर पाटील, अशोक कडुस, दशरथ दिघे, सहाय्यक लेखाधिकारी विजय बर्डे, भगवान निकम आदी उपस्थित होते.

अक्षर पटेल आता दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार!

शैक्षणिक धोरणासाठी आर्थिक तरतूद (ZP)

अंदाजपत्रकात जिल्हा परिषद शाळांमध्ये ओपन सायन्स पार्क विकसित करण्यासाठी ५० लाख रुपये, मिशन स्पार्क अंतर्गत थुंबा केरळ येथे विक्रम साराभाई स्पेस सेंटर, इसरो, आयआयएस, डीआरडीओ अशा संशोधन संस्थांमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहली आयोजित करण्यासाठी २८ लाख ५० हजार रुपये, मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता ३ री, ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारी पुस्तिका छापणे, इयत्ता ४ थी व ७ वी सराव परीक्षा घेणे तसेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करणे व ऑनलाईन तासिकांसाठी ६ लाख रुपये, जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फी भरणे, सराव परीक्षा घेणे व सराव प्रश्नसंच पुस्तिकांसाठी ३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


सुरभि सुरक्षा अभियानांतर्गत गायी म्हशीच्या पोटातील लोहजन्स वस्तूंपासून प्रतिबंध व उपायांकरिता साहित्य व उपकरणे पुरवणेसाठी १० लाख, ड्रोन फवारणी यंत्र देण्यासाठी ७० लाख रुपये, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्लरी फिल्टर उपकरण अनुदानावर देण्यासाठी १२ लाख ५० हजार रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इमारतींवर सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी १० लाख रुपये, जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते व दळणवळण सुविधेसाठी ३ कोटी ९५ लाख रुपये, जलधारा अंतर्गत जलसंधारण कामाची देखभाव व दुरुस्तीसाठी १ कोटी आदी तरतूदी अंदाजपत्रकात करण्यात आल्या आहेत.
याशिवाय वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी तरतदू करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना कडबाकुट्टी पुरविणेसाठी ५५ लाख रुपये, इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सुमारे १ हजार मुलींना मोफत सायकल देण्यासाठी ६० लाख रुपये, इयत्ता ५ वी ते १० वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे ६१६ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जेन्टस सायकल देण्यासाठी ३७ लाख रुपये, मागासवर्गीय शेतकऱ्यांना स्प्रे पंप खरेदीसाठी ५२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य, मागासवर्गीय शेतकऱ्यांना स्प्रिंकलर खरेदीसाठी ५५ लाख रुपये, मागासवर्गीय व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणी घेण्यासाठी अर्थसहाय्य पुरविण्यासाठी ५० लाख रुपये, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणीसाठी ३० लाख ३० हजार रुपये, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी झेरॉक्स मशीनसाठी ३० लाख ३० हजार रुपये, ग्रामीण भागातील महिलांना व मुलींना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी ३३ लाख रुपये, ग्रामीण भागातील दिव्यांग महिला, बालकांना साहित्य पुरवण्यासाठी ३ लाख ६५ हजार रुपये, शेतकऱ्यांना स्लरी फिल्टर उपकरण अनुदानासाठी १२ लाख ५० हजार रुपये, पशुपालकांना दूध काढणी यंत्रांचा ६० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यासाठी २० लाख रुपये, पशुपालकांना मुक्त संचार गोठा उभारण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदानासाठी १५ लाख रुपयांची तरतदू करण्यात आली आहे.