ZP : नगर : अहिल्यानगर जिल्हा परिषदेत (Ahilyanagar Zilla Parishad) गेल्या काही दिवसांपासून प्रशासकराज सुरू असल्याने संपूर्ण कारभार सध्या प्रशासनाकडूनच (Administration) पाहिला जात आहे. मात्र, या दरम्यान जिल्हा परिषद (ZP) पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाकडे प्रशासनाचे स्पष्टपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
अवश्य वाचा: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ४२ अर्ज दाखल
निवासस्थाने अत्यंत दयनीय अवस्थेत
शहरातील लाल टाकी परिसरात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांसाठी अधिकृत निवासस्थाने आहेत. ही निवासस्थाने सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव जाणवत असून परिसर अस्वच्छ आणि दुर्लक्षित झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तातडीने स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी (ZP)
स्थानिक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन या निवासस्थानांची स्वच्छता व दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक पदांवरील व्यक्तींसाठी असलेल्या निवासस्थानांचीच अशी अवस्था असेल, तर सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे किती गांभीर्याने पाहिले जात असेल, असा सवालही उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


