ZP Elections : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध

ZP Elections : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध

0
ZP Elections : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध
ZP Elections : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध

ZP Elections : नगर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) आगामी निवडणुकीच्या (ZP Elections) पार्श्वभूनीवर जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरु आहे. अंतिम मतदार यादी सोमवारी (ता.३) नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. ही यादी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसील कार्यालये आणि पंचायत समिती कार्यालयांमध्ये पाहणी व निरीक्षणासाठी उपलब्ध असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) (महसूल), अहिल्यानगर यांनी दिली आहे.

अवश्य वाचा: युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार

अंतिम मतदार याद्या तयार (ZP Elections)

जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभाग १ ते ७५ तसेच पंचायत समिती क्षेत्रातील निर्वाचक गण क्रमांक १ ते १५० यांच्या प्रारूप मतदार याद्यांबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांचा विचार करून, अधिप्रमाणित अंतिम मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. ३ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप झाले संतप्त; स्वच्छता निरीक्षकांची घेतली झाडाझडती