Abhijeet Panse : अभिजीत पानसे यांच्या ‘रानबाजार २’ची घोषणा

‘प्लॅनेट मराठी’च्या आशयनिर्मिती संबंधित समितीवर प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते अभिजीत पानसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

0
Abhijeet Panse
Abhijeet Panse

नगर : ‘प्लॅनेट मराठी’ (Planet Marathi) या पहिल्या मराठी ओटीटी वाहिनीने कामाच्या विस्ताराच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘प्लॅनेट मराठी’च्या आशयनिर्मिती संबंधित समितीवर प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते अभिजीत पानसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पानसे यांच्या नियुक्ती बरोबर त्यांनीच लिहिलेल्या ‘रानबाजार’ (Ranbazar) या गाजलेल्या मालिकेचा दुसरा भाग लवकरच येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, जयवंत दळवी यांच्या गाजलेल्या ‘पुरुष’ या नाटकावर वेबमालिकेची निर्मिती करणार असल्याचेही पानसे यांनी सांगितले.

नक्की वाचा : करण जोहरच्या लव्ह स्टोरीयाचा ट्रेलर प्रदर्शित   

‘रानबाजार’ या वेबसीरिजने संपूर्ण मराठी मनोरंजन सृष्टीत खळबळ माजवली होती. प्रेक्षकांसह, शाम बेनेगल, एन.चंद्रा अशा अनेक मान्यवरांनी त्यांच्या या वेबसीरिजचे कौतुक केले. अनेक धाडसी, ज्वलंत, संवेदनशील विषयांना वाचा फोडणे, ही अभिजित पानसे यांची खासियत आहे. या कारणामुळेच त्यांची कलाकृती ही नेहमीच इतरांपेक्षा सुपरहिट ठरलेली आहे. आता त्याच्या रानबाजार २ या सिरीजमध्ये काय असणार आणि कोणते कलाकार भूमिका साकारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

‘पुरुष’ हे नाटक आता वेब मालिकेच्या स्वरुपात (Abhijeet Panse)

लेखक जयवंत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेले आणि रघुवीर तळाशिलकर यांनी दिग्दर्शित केलेले ‘पुरुष’ हे नाटक १९८२ साली पहिल्यांदा रंगमंचावर आले होते. पुरुषी मनोवृत्ती आणि त्याला बळी पडणाऱ्या स्त्रिया या विषयावर भाष्य करणारे हे नाटक नाना पाटेकर, रिमा लागू, उषा नाडकर्णी यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांच्या अभिनयाने गाजले. आता ओटीटी या नव्या माध्यमावर वेब मालिकेच्या स्वरुपात हे नाटक पाहता येणार आहे. अभिजीत पानसे यांच्या रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि श्रीरंग गोडबोले यांच्या इंडियन मॅजिक आय यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच प्लॅनेट मराठीच्या सहकार्याने या वेब मालिकेची निर्मिती करण्यात येत आहे. यात अभिनेते सचिन खेडेकर प्रमुख भूमिका साकारणार आहेत

अवश्य वाचा : वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’चे पोस्टर आऊट; वरूनच अँग्री लूक पहाच!

अभिजीत पानसे काय म्हणाले ? (Abhijeet Panse)

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक जण स्वतंत्ररित्या काम करतात. एकत्र येऊन काम करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे मराठीत भव्यदिव्य कलाकृती निर्माण करण्यासाठी एकत्रित संघटना स्तरावर प्रयत्न आवश्यक आहेत, असे अभिजीत पानसे यांनी सांगितले. त्याची सुरुवात म्हणून स्वत:ची निर्मिती संस्था आणि इंडियन मॅजिक आय, प्लॅनेट मराठी या तिन्ही संस्थांना एकत्र आणून ‘पुरुष’ नाटकावर आधारित वेबमालिका निर्मितीचा प्रयत्न केला जात आहे, असेही ते म्हणालेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here