Accident : श्रीगोंदेतील चार भाविकांवर काळाचा घाला

Accident : श्रीगोंदेतील चार भाविकांवर काळाचा घाला

0
Accident
Accident : श्रीगोंदेतील चार भाविकांवर काळाचा घाला

Accident : श्रीगोंदा : एकादशीच्या निमित्ताने आळंदी येथे माऊलींच्या दर्शनासाठी गेलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील भक्तांवर काळाने घाला घातला. ढवळगाव परिसरात बस व खासगी वाहनाच्या अपघातात (Accident) चार जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला, तर तीन जण गंभीर जखमी (Seriously Injured) झाले.

हे देखील वाचा: नवरदेव तरुणाचा जायकवाडी धरणाच्या कालव्यात आढळला मृतदेह

जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु

या दुर्दैवी घटनेत पारगाव येथील पारगाव सेवा संस्थेचे व्हा. चेअरमन विश्वनाथ लक्ष्मण ननवरे (वय ५५), पारगाव सेवा संस्थेचे सदस्य हरी तुकाराम लडकत (वय ६०), ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बापूराव मडके (वय ५५), दत्तात्रय बळीराम खेतमाळीस (वय ६०) या चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर कारचालक विठ्ठल गणपत ढोले (वय ३६, रा.लोणी व्यंकनाथ), रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस (वय ७०), रोहिदास सांगळे (वय ७२) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दर्शनासाठी गेलेले गोपीनाथ हिरवे हे मुलाला भेटण्यासाठी पुणे येथे गेल्याने बालंबाल बचावले.

हे देखील वाचा: जातीवाचक शिवीगाळ, नग्न करुन मारहाण; तरुणाची आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here