Narendra Modi : नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वाहतुकीत बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग काेणते?

Narendra Modi : नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वाहतुकीत बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग काेणते?

0
Narendra Modi
Narendra Modi

काेड रेड…

Narendra Modi : नगर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) निमित्ताने नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या (ता. ७) नगर दौऱ्यावर येत आहेत. नगरमध्ये महायुतीचे उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यासाठी सभा घेण्यात येणार आहे. या सभेच्या निमित्ताने महायुतीनेही जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानिमित्त वाहतुकीत बदल (Traffic diverted) करण्यात आला आहे. 

हे देखील वाचा: जातीवाचक शिवीगाळ, नग्न करुन मारहाण; तरुणाची आत्महत्या

वाहतुकीत करण्यात येणार बदल (Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नगर शहरामध्ये संत निरंकारी भवन जवळील मैदानावर प्रचार सभा घेणार आहे. या सभेकरिता नगर जिल्हा तसेच राज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक नगर शहरात येणार आहेत. त्यामुळे नगर शहरात वाहतूक काेंडी हाेण्याची शक्यता आहे. नगर शहरातून पुणे, मुंबई, विदर्भ, मराठवाडा आदी ठिकाणांना जोडणारे महत्वाचे महामार्ग जात आहे. या महामार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असते. या वाहतुकीमुळे पंतप्रधानांचा ताफा सभेच्या ठिकाणी येण्यास अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी मंगळवार (ता. ७) राेजी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे, असे आदेश पाेलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहे.

नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील

असे असणार पर्यायी मार्ग (Narendra Modi)

  • पाथर्डीकडून नगर मार्गे सोलापूर, दौंड, पुणे, मुंबई, मनमाड व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी अवजड वाहतूक व खासगी वाहनांकरिता पर्यायी मार्ग चांदबिबी महाल, सारोळा, जामखेड रस्ता, निंबोडी, वाळुंज बायपास, अरणगाव बायपास, केडगाव बायपास, विळद बायपास, शेंडी बायपास मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे. याशिवाय दुसरा मार्ग बेल्हेश्वर चाैक, महात्मा फुले चौक, नागरदेवळे, बुन्हाणनगर, वारुळवाडी, गजराजनगर चौक मार्गे जाता येणार आहे. – सोलापूरकडून नगर मार्गे पुणे, मुंबई, मनमाड, व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी सर्व अवजड वाहतूक व इतर वाहनांकरिता पर्यायी मार्ग वाळुंज बायपास, अरणगाव बायपास, केडगाव बायपास, विळद बायपास, शेंडी बायपास मार्गे जाता येणार आहे.
  • दौंडकडून नगर मार्गे पुणे, मुंबई, मनमाड व छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या अवजड तसेच इतर वाहनांकरिता पर्यायी मार्ग अरणगाव बायपास, केडगाव बायपास, विळद बायपास, शेंडी बायपास मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे.
  • पुणे-कल्याणकडून नगर मार्गे मनमाड, छत्रपती संभाजीनगरकडे तसेच सोलापूर, जामखेड, पाथर्डीकडे जाणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक व इतर वाहनांकरिता पर्यायी मार्ग
    केडगाव बायपास, विळद बायपास, शेंडी बायपास मार्गे तसेच केडगाव बायपास, अरणगाव बायपास, वाळुंज बायपास, जामखेड राेड, सारोळा बद्दी, चांदबिबी महाल मार्गे इच्छितस्थळी जाता येईल.
  • मनमाड, छत्रपती संभाजीनगरकडून नगर मार्गे कल्याण, पुणे, दौंड. सोलापूर, जामखेड, पाथर्डीकडे जाणारी अवजड वाहतूक व इतर वाहनांकरिता पर्यायी मार्ग शेंडी बायपास, दूध डेअरी, विळद बायपास, केडगाव बायपास, अरणगाव बायपास, वाळुंज बायपास, जामखेड रोड, सारोळा, चांदबिबी महालमार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे.
  • पारिजात कॉर्नर चोक या ठिकाणाहून बीएसएनल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. आनंद विद्यालयाच्या बाजूच्या रस्त्यावरुन संत निरंकारी भवनाच्या मोकळ्या जागेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. नुपूर इस्टेट एजन्सीपासुन संत निरंकारी भवनाच्या मोकळ्या मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. रेणुका माता मंदिरापासून जॉगिंग ट्रॅककडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
  • न्यू सिंध कॉर्नरपासून जॉगिंग ट्रॅककडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.गंगा उद्यानकडून संत निरंकारी भवनाच्या मोकळ्या मैदानाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने श्री कृष्ण मंदिरापासून एलआयसी कॉलनी मार्गे प्रोफेसर कॉलनीकडे वळविण्यात येणार आहे. तसेच एलआयसी कॉलनीकडून संत निरंकारी भवनाच्या मोकळ्या मैदानाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना श्रीकृष्ण मंदिरमार्गे गंगा उद्यानाकडे वळवण्यात येणार आहे. तारकपूर रस्त्यावरून संत निरंकारी भवनाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मिस्कीन मळा मार्गे प्रोफेसर चौक रस्त्याकडे वळवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here