Adarsh Shinde : आदर्श शिंदेच्या आवाजातलं ‘प्रभू श्रीराम’ गाणं प्रदर्शित

अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. या मंदिराच्या उद्घाटनाच्या औचित्याने प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे.

0
Adarsh Shinde

नगर : अयोद्धेत (Ayodhya) येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचा (Ram Mandir) उद्धाटन सोहळा पार पडणार आहे. श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेचा देशभरात उत्साह आहे. संत महंतांसोबत सेलिब्रिटीदेखील या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. या पार्श्वभूमीवर लोकप्रिय गायक आदर्श शिंदेने (Adarsh Shinde) ‘प्रभू श्रीराम’ (Prabhu Shree Ram) हे गाणं गायलं आहे. आदर्श शिंदेच्या सुरेल आवाजातील हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार

अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. या मंदिराच्या उद्घाटनाच्या औचित्याने प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे. आदर्श शिंदेच्या आवाजातील हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आला आहे. या व्हिडिओची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे. या गाण्याची संकल्पना साईनाथ राजाध्यक्ष यांची आहे. तर विपुल शिवलकर यांच्या गीताला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केलं आहे.  

अवश्य वाचा : ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा टिझर रिलीज ;एकदा पहाच!

अयोध्येचा राजा आपला राम मंदिरी अवतरला आता असे या गाण्याचे शब्द आहेत. गाण्याचे संगीत प्रत्येक रामभक्ताला  भक्तीचा उत्साह देणारं आहे. ग्राफिक्सचा उत्तम वापर करून या गाण्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. त्यात भावभक्तीने ओथंबलेले श्रीराम भक्त, शरयू तीरावरील आरती, श्रीराम मंदिराची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. आदर्श शिंदेने ‘प्रभू श्रीराम’ हे गाणं प्रदर्शित झाल्याची माहिती देत खास पोस्ट शेअर केली आहे.
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here