Ahilyanagar news:महाराष्ट्रभर घुमतोय अहिल्यानगरमधील टाळांचा नाद!

0
Ahilyanagar news:महाराष्ट्रभर घुमतोय अहिल्यानगरमधील टाळांचा नाद!
Ahilyanagar news:महाराष्ट्रभर घुमतोय अहिल्यानगरमधील टाळांचा नाद!

Ahilyanagar news : ‘पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव, घास घे रे विठ्ठला बोले नामदेव’ असं म्हणतं महाराष्ट्रातील वारकरी (Warkari) हे आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari) पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. मात्र या वारीमध्ये चैतन्य संचारते ते वारकरी अभंगाच्या तालावर वाजवत असलेल्या टाळामुळे आणि हीच टाळ (Taal) बनवण्याची परंपरा जपली आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याने. अहिल्यानगर मधील कांस्याचे टाळ हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. हेच टाळ बनवणारे अनेक कारागीर अहिल्यानगर शहरात आहेत.

नक्की वाचा : साईभक्तांसाठी मोठी बातमी;शिर्डीतील सर्व दुकानांसाठी आता एकच दरपत्रक 

वारकरी संप्रदायात टाळाला विशेष स्थान  (Ahilyanagar news)

वारकरी सांप्रदायामध्ये भजन, कीर्तन जितके अनादी आहेत, तितकेच टाळ हे वाद्य देखील. टाळ-मृदंगाचा गजर व मुखी हरिनामाचा जप हीच महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीची व संतपरंपरेची ओळख आहे. वारकरी म्हणला की, आपल्या डोळ्यासमोर टाळ घेतलेली व्यक्ती समोर उभी राहते. टाळाशिवाय अभंग अपूर्णच आहे. हेच टाळ नगरमधील काही कारागीर बनवतात. जितका या टाळांमधून निघणारा नाद ऐकायला मधुर वाटतो तितकाच तो टाळ बनवताना या कारागिरांना मेहनत घ्यावी लागते. पंढरपूरमध्ये जे वारकरी जातात त्या प्रत्येकाच्या हातात नगरचा टाळ असतो,असं टाळ बनवणारे कारागीर संतोष सुरेश कलमदाणे यांनी सांगितले आहे.

अवश्य वाचा :  रेल्वेभाडेवाढ ते तत्काळ तिकीट;भारतीय रेल्वेच्या नियमामध्ये आजपासून मोठे बदल 

वारकऱ्यांना भजन गाताना साथ करणारे मुख्य साधन म्हणजे टाळ  (Ahilyanagar news)

ज्या दोन वस्तूंचा एकमेकांशी आघात करून एक नाद उत्पन्न होतो तो म्हणजे टाळ. सर्व वारकऱ्यांना भजन गाताना साथ करणारे मुख्य साधन म्हणजे टाळ आहे. हेच टाळ मागील अनेक वर्षांपासून आपल्या अहिल्यानगरमध्ये बनवले जातात. नगरच्या या टाळांची खास ओळख म्हणजे हे टाळ मंजुळ व दीर्घ नाद उत्पन्न करतात. संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी हे टाळ खरेदी करण्यासाठी अहिल्यानगर शहरात आवर्जून येत असतात. त्यातच सध्या आषाढी एकादशी असल्याने या टाळांना मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहेत. एकंदरीतच काय तर आपल्या अहिल्यानगरचे टाळ वारकरी परंपरा जपत संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठभक्तीचा नाद तयार करण्याचे काम करत आहेत.