नगर : मराठी भाषेविषयी माहिती व मराठी भाषेची महती सांगणारे ‘अभिजात मराठी राजभाषा गौरव गीता’चे (Abhijat Marathi Official Language Pride Song) अनावरण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष बाब म्हणजे या गीताचे गायन अहिल्यानगरची (Ahilyanagar) प्रसिद्ध गायिका अंजली गायकवाड(Anjali Gaikwad), नंदिनी गायकवाड आणि त्यांचे वडील अंगद गायकवाड यांनी केलेले आहे.
नक्की वाचा : तनिषा भिसेंच्या बाळांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २४ खांची मदत
गायकवाड भगिनींने गायले मराठी राजभाषा गौरव गीत (Ahilyanagar)
गायकवाड भगिनी या ‘सारेगमप लिटिल चॅम्प, संगीत सम्राट, तसेच लखनौ मधील क्लासिकल वाॅईस या स्पर्धेच्या विजेत्या आहेत. अंजली गायकवाडला शाहू मोडक पुरस्कार, संगीत सम्राट पुरस्कार मिळालेले आहेत. या गीताला गेल्या पंचवीस वर्षापासून संगीताचे शिक्षण देणारे अंगद गायकवाड यांनी संगीत दिलेले आहे. शुद्ध कल्याण हा मुख्य राग या गाण्यामध्ये वापरलेला आहे. याबरोबरच मिश्र मारु बिहाग, मिश्र भूप, मिश्र यमन, भटियार, शंकरा, हंसध्वनी, ललित, मारवा, पूरिया धनश्री या रागांचा वापर या गीतामध्ये करण्यात आलेला आहे. या गाण्याचे गीतकार डॉ महेश दळे हे हे अहिल्यानगरचे रहिवासी आहेत. मराठी भाषेतील कंदर्प वृत्तामध्ये या गाण्याचे बोल लिहिलेले आहेत.
अवश्य वाचा : सचिन कुर्मींच्या हत्येमागे भाजप व शिवसेना नेत्याचा कार्यकर्ता;कुटूंबाचा आरोप
‘सत्ययुग योगायुर्वेदम’ या यूट्यूब चॅनलवर गीत प्रदर्शित (Ahilyanagar)
मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. या भाषेविषयी आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटणारी तळमळ व तिच्या विषयीचा अभिमान गीतकाराने शब्दबद्ध केला आहे. या शब्दांना पूर्णपणे न्याय देईल,असेच संगीत संगीतकार अंगद गायकवाड यांनी दिलेले आहे. गीतकार व संगीतकारांच्या कौशल्यांवर शोभून दिसणारा मुकुट म्हणजेच गायकवाड भगिनी व त्यांचे गुरु व पिता श्री अंगद गायकवाड यांचे सुमधुर गायन हे होय. ‘सत्ययुग योगायुर्वेदम’ या यूट्यूब चॅनल वर हे गीत रसिकांना पाहायला मिळणार आहे. तसेच सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्मवर सुद्धा हे गीत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.