Tanisha Bhise Case : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) प्रसूतीदरम्यान तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांचं निधन झालं. त्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र दोन्ही नवजात बाळांचे वजन अत्यल्प असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून विशेष निगा राखण्यात येत आहे. या बाळांच्या उपचारासाठी २४ लाख (24 lakh) रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी (Chief Minister’s Relief Fund) कक्षामार्फत देण्यात आली आहे.
नक्की वाचा : सचिन कुर्मींच्या हत्येमागे भाजप व शिवसेना नेत्याचा कार्यकर्ता;कुटूंबाचा आरोप
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून तनिषा भिसेंच्या मुलांना मदत (Tanisha Bhise Case)
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून देण्यात आलेली ही मदत ही रुग्णालयाने दिलेल्या अंदाजपत्रकानुसार देण्यात आली आहे.यापुढे देखील पुढील उपचारासाठी आणखी आवश्यकता भासल्यास त्याचा लागणारा संपूर्ण खर्चही कक्षातूनच केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले आहे.
अवश्य वाचा : लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे १५०० रुपये ‘या’ दिवशी मिळणार
पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये पैशांअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने तनिषा भिसेंचा मृत्यू झालाचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. त्यानंतर अनेक संस्था, संघटना, पक्षांनी रुग्णालयासमोर आंदोलने केली. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.
एका बाळासाठी १० लाख तर दुसऱ्या बाळासाठी १४ लाख रुपयांची मदत (Tanisha Bhise Case)
तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिसे कुटुंबीयांची तात्काळ भेट घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली होती. त्यावेळी दोषींवर कारवाई करू असंही त्यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर मदतीचं आश्वासन देखील दिलं होतं, काल (ता.२) संबंधित रुग्णालयात मदतीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उपचाराकरिता एका बाळासाठी १० लाख, तर दुसऱ्या बाळासाठी १४ लाख रुपये मदत म्हणून दिली गेली आहे. सध्या दोन्ही बाळांचे उपचार पुण्यातील सूर्या हॉस्पिटल येथे सुरू असून त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे नाईक यांनी सांगितले आहे.