Akole : अकोले: शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अकोले (Akole) बसस्थानकाचे सुशोभीकरणाचे (Embellishment) काम सुरु होऊन एक महिना झाला आहे. मात्र, हे काम अतिशय संथ गतीने चालू असल्याने प्रवासी, व्यावसायिकांना मनस्ताप होत आहे.
हे देखील वाचा: आरक्षणाच्या विरोधकांना पूर्ण ताकदीने पाडा; मनोज जरांगे पाटलांचे मराठ्यांना आवाहन
धिम्या गतीने काम चालू
सुशोभीकरणाच्या नावाखाली बसस्थानक परिसर जवळपास दोन फूट खोदून ठेवला आहे. बसस्थानकाच्या काही भागात खोदकाम झाल्यावर खडी टाकण्यात आली. त्यावर एक मजूर दररोज पाणी मारून मारून दमला आहे. आता त्याने त्या खडीवर पाणी मारण्याचे काम बंद केले आहे. त्याच्या शेजारी एक रोलर अनेक दिवसांपासून फक्त उभा आहे. अशा धिम्या गतीने काम चालू राहिल्यास या खोदलेल्या जागेत पाऊस झाला तर स्वीमिंग पूलचे स्वरूप प्राप्त येईल, असे टीकात्मक टिप्पणी एका प्रवाशाने व्यक्त केली.
नक्की वाचा: विरोधकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही : राधाकृष्ण विखे पाटील
बसची ये-जा करताना चालकांना मोठी कसरत (Akole)
बसस्थानकाच्या खोदलेल्या जागेवर खासगी वाहनांचे वाहनतळ म्हणून सध्या वापर होत असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहने उभी असतात. रस्त्यावर पार्किंग होत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. बस उभी करण्यासाठी जागा नसल्याने फार कमी जागेत बसची ये-जा करताना चालकांना मोठी कसरत होत आहे. प्रवाशांना बसमध्ये जागा धरण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. प्रवासी हे व्यावसायिकांच्या दुकानासमोर उभे राहत आहे. त्यामुळे त्याही बाजूला व्यावसायिकांची अडचण होत आहे. त्यामुळे बसस्थानकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी नागरिक, प्रवासी व व्यावसायिक करीत आहेत.