Classical Dance : आर्ट असोसिएट्सतर्फे शास्त्रीय नृत्यातील विविध नृत्य तालांचा अविष्कार; नाशिकमध्ये उद्या नगरमधील कलाकारांना मिळणार संधी

Classical Dance

0
Classical Dance
Classical Dance

Classical Dance : नगर : आर्ट असोसिएट्स हे तीन मैत्रिणींच्या संकल्पनेतून पुढे आलेले व्यासपीठ आहे. या व्यासपीठातर्फे शनिवार (ता. २७) राेजी नाशिक (Nashik) येथील शंकराचार्य न्यास येथे विश्वविक्रमासाठी (World Record) शास्त्रीय नृत्यातील (Classical Dance) विविध नृत्य तालांचा (रिले फॉरमॅट) आविष्कार सादर केला जाणार आहे.

हे देखील वाचा: आरक्षणाच्या विरोधकांना पूर्ण ताकदीने पाडा; मनोज जरांगे पाटलांचे मराठ्यांना आवाहन

एका पाठोपाठ एक न थांबता नृत्याविष्कार सादर (Classical Dance)

अमी छेडा, राधिका चावरे आणि तोरल टकले या तीन नृत्यांगनांचे नृत्यावर असलेले प्रेम आणि वर्षभर विविध भारतीय सणांना नृत्यनाट्य रुपात गुंफताना त्याचे स्वरूप कसे असू शकते, या एका संकल्पनेतून आर्ट असोसिएट्सची निर्मिती झाली. त्यानुसार २७ एप्रिल रोजी या कार्यक्रमाद्वारे शास्त्रीय नृत्यातील विविध प्रकारातून पौराणिक व ऐतिहासिक कथा नृत्याद्वारे महाराष्ट्रातील नृत्यांगना, कलाकार हे विश्वविक्रमासाठी एका पाठोपाठ एक न थांबता नृत्याविष्कार सादर करणार आहेत. हा आगळावेगळा कार्यक्रम म्हणजे एक नृत्यपर्वणीच असेल. असा या तिघींना विश्वास वाटतो.

नक्की वाचा: अबब! नगर लाेकसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकाच नावाचे दाेन उमेदवार

सलग ४८ मिनिटे पौराणिक कथांवरील कथक नृत्य सादर (Classical Dance)

यासाठी नगर येथून कथक नृत्य कलाकार व आर्मी शाळेतील एकूण ५० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यात सलग ४८ मिनिटे विविध पौराणिक कथांवरील कथक नृत्य सादरीकरण हे कलाकार करणार आहेत. याची रंगीत तालीम नगर येथे नुकतीच घेण्यात आली. यासाठी ख्यातनाम सुफी गायक पवन नाईक व प्रसिद्ध तबला वादक मंदार सुवर्णपत्की यांची उपस्थिती लाभली. नृत्य व पौराणिक कथांचा मेळ सर्व नृत्यांगनांनी साधला आहे, अशी कौतुकाची थाप दोन्ही मान्यवरांनी यावेळी कलाकारांना दिली. आपल्या कलेची साधना तसेच नवनवे प्रयोग तुम्हाला चांगले नृत्य कलाकार बनण्यासाठी आवश्यक आहे व ते निरंतर ठेवा, असा कानमंत्र दोन्ही मान्यवरांनी दिला. या कार्यक्रमातून एकूण १५० पेक्षा अधिक कलाकार, सलग ७ तासांहून अधिक नृत्य सादर करणार आहेत. अशा अनोख्या कार्यक्रमात नृत्य सादर करण्याची संधी नगरमधील कलाकारांना लाभली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here