Radhakrishna Vikhe Patil : विरोधकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही : राधाकृष्ण विखे पाटील 

Radhakrishna Vikhe Patil : विरोधकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही : राधाकृष्ण विखे पाटील 

0
Radhakrishna Vikhe Patil
विरोधकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही : राधाकृष्ण विखे पाटील 

Radhakrishna Vikhe Patil : कर्जत : विरोधकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नसून केवळ मोदी द्वेष हाच अजेंडा पुढे करून निवडणुका जिंकता येतात, हा त्यांचा भ्रम आहे. निवडणुकीसाठी सर्वसामान्य जनतेचे काम करावे लागते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हाच एकमेव उपाय असून अब की बार ४०० पार चा नारा देशाची जनता पूर्ण करेन आणि महाराष्ट्रातसुद्धा महायुती ४५ चा नारा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी कर्जत येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी माजीमंत्री आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) उपस्थित होते. यावेळी राधाकृष्ण विखेंनी मित्रपक्षासह विविध संघटनांच्या बैठका घेत प्रत्यक्ष संवाद साधला.

xr:d:DAF5Y3epXKI:976,j:4112210993882823500,t:24041112

हे देखील वाचा: देशाच्या भल्यासाठी या सरकारने काहीच केलेले नाही : शरद पवार

विरोधकांवर आरोपांची डागली तोफ (Radhakrishna Vikhe Patil)

विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोपांची तोफ डागली. इंडिया आघाडीची मोट बांधणारे महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय नेते ज्यांना १० जागेवर उमेदवार उभा करताना नाकीनऊ आले. ते विरोधकांची मोट बांधायला निघाले, असे म्हणत शरद पवारांना लक्ष्य केले. तर ज्यांनी रामाचे अस्तित्व नाकारले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. त्यांच्या मांडीला-मांडी लावून बसण्याचे काम हिंदुत्वाचे पुरस्कार करणारे उद्धव ठाकरे करीत आहे. सत्तेसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीला त्यांनी तिलांजली देण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे फक्त मतांचे लांगुलचालन करण्यासाठी दिसत आहे. त्यात विकासक असे काहीच नाही.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : विरोधकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही : राधाकृष्ण विखे पाटील 

नक्की वाचा : तब्बल एक तपानंतर चोरीला गेलेले दागिने मिळाले; शिक्षिकेच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले

भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी लढत (Radhakrishna Vikhe Patil)

देशाचे पंतप्रधान भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी लढत असताना विरोधक त्याच भ्रष्टाचारास राजाश्रय देण्यासाठी एकत्र येत आहे, ही शोकांतिका असल्याचे विखेंनी म्हंटले. गुरुवारी (ता.२६) राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रा. राम शिंदेंसह स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांनी सकाळी मिरजगाव येथे व्यापारी बैठक घेतली तर दुपारी कर्जत शहरात बार असोसिएशन, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आरपीआय, मनसे यासह अल्पसंख्याक शिष्टमंडळ, कर्जत तालुका व्यापारी असोसिएशन आणि संध्याकाळी कर्जत तालुका वैद्यकीय, केमिस्ट आणि पॅथॉलॉजी लॅब यांच्याशी मॅरेथॉन बैठका पार पाडत संवाद साधला. कर्जत तालुका डॉक्टर असोसिएशनच्या बैठकीत राम शिंदेंनी आपल्या भाषणात आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील विकासाच्या कामा पाढा वाचला. त्यांनी कर्जत-जामखेड तालुक्यातील रस्ते, कर्जतच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न, कुकडी आवर्तन, अंतर्गत रस्ते आणि उद्यान उभारले असल्याचे सांगितले. जसे एखादया रुग्णाला गुण आल्यावर तो पुन्हा कधीच त्याला बरे केलेल्या डॉक्टरला बदलत नाही. तसे सर्वसामान्य मतदारांनी देखील काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला बदलले नाही पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here