AMC : नगर : नगर महापालिकेची (AMC) मुदतही आता बुधवार (ता. २७) संपुष्टात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयाेगाने (State Election Commission) प्रशासक (administrator) नेमण्यासाठी निर्देश दिले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना यापुढील कालावधीत कुठल्याही प्रकारची सभा किंवा बैठक घेता येणार नाही, असे आदेश महापालिका प्रशासनाकडून नुकतेच जारी करण्यात आले आहे.
अवश्य वाचा : ३१ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत पुणे-नगर मार्गावरील वाहतुकीत बदल
महापालिका सभागृहाची मुदत संपतानाच एक कळीचा मुद्दा उपस्थित केला जातो, तो म्हणजे मुदत संपल्यावर महापालिकेवर प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती होणार? राज्यात यापूर्वी जिल्हा परिषद असो किंवा महापालिका, यांची मुदत संपल्यानंतर तेथे कार्यरत आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. नगर महापालिकेबाबत मात्र वेगळा प्रश्न उपस्थित केला जातो, त्याला कारण जसे राजकीय आहे, तसे ते प्रशासकीयही आहे.
नक्की वाचा : घराबाहेर पडा, मुंबईला चला; मनाेज जरांगेंचा मार्ग ठरला