Anganwadi worker : नेवासा तहसीलवर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा 

Anganwadi worker : नेवासा : मानधन वाढीसह (Salary increase) विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे (State Govt) लक्ष वेधण्यासाठी नेवासा तालुक्यातील अंगणवाडी सेविका (Anganwadi worker) आणि मदतनीसांनी गुरुवारी (ता.२८) काम बंद करून नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

0
Anganwadi worker : नेवासा तहसीलवर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा 
Anganwadi worker : नेवासा तहसीलवर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा 

Anganwadi worker : नेवासा : मानधन वाढीसह (Salary increase) विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे (State Govt) लक्ष वेधण्यासाठी नेवासा तालुक्यातील अंगणवाडी सेविका (Anganwadi worker) आणि मदतनीसांनी गुरुवारी (ता.२८) काम बंद करून नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्ची खाली करा,अशा घोषणा देत सेविकांनी मोठ्या आक्रमकपणे मोर्चा काढून आंदोलन केले.

नक्की वाचा : घराबाहेर पडा, मुंबईला चला; मनाेज जरांगेंचा मार्ग ठरला 


राज्य सरकारने वेळोवेळी मानधनवाढीचे आश्वासन दिले. मात्र, ते पाळले गेले नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना काम बंद करुन मोर्चा काढण्याची वेळ आलेली असून राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य करण्याची मागणीही यावेळी मोर्चाकरी अंगणवाडी सेविकेतून करण्यात आली. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत अंगणवाडी सेविका, मदतनीस काम बंद आंदोलन सुरूच ठेवतील, असा निर्धारही यावेळी अंगणवाडी सेविकांतून करण्यात आला. नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार बोरुडे यांना दिले. यावेळी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या मोर्चाला मोठा प्रतिसाद ‌मिळाला. अंगणवाड्या संप काळात बंद ठेवून तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस नेवासा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात एकत्रित आल्या व येथून दुपारी १२ वाजता नेवासा तहसील कार्यालयावर हा मोर्चा आणण्यात झाला.

अवश्य वाचा : ३१ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत पुणे-नगर मार्गावरील वाहतुकीत बदल


नेवासा तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने आलेल्या सेविका, मदतनिसांनी तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चामध्ये अंगणवाडी सेविका रंजना खरात, सुनिता पवार, सुरेखा नवले, कांचन नवले, कविता नवले, प्रमिला गव्हाणे, कुसूम फुलारी, हिरा फुलारी, वंदना मापारे, कुसूम फुलारी, पुष्पा गुंड, आशा खरात, मंगल खरात, वर्षा बनसोडे, सविता शेलार यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका यावेळी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here